गृहमंत्र्यांची शरद पवारांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक, अनेक चर्चाना उधाण

0 1,328
नवी मुंबई –   राज्याची राजधानी मुंबई (Mumbai) येथे मागच्या महिन्यापासून अभिनेता शाहरुख खान (Actor Shah Rukh Khan) याचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याला एनसीबी (NCB) च्या पथकाने कारवाई करून अटक केल्यानंतर मुंबईचा राजकीय पारा चांगलाच तापला आहे. या प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) चे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी भारतीय जनता पक्षावर (BJP) आणि एनसीबीचे अधिकारी समीर वानखडे (Sameer Wankhade) यांच्यावर पत्रकार परिषद घेऊन टीका करत असून दोन्ही बाजूने आरोप प्रत्यारोप सुरु आहे. (Important meeting of Home Minister in the presence of Sharad Pawar, many discussions abound)
 
यातच आज सकाळपासून राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांच्या निवासस्थानी सिल्वर ओक (Silver Ok) वर शिवसेना (Shiv Sena) खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चाना उधाण आला आहे. तर दुसरीकडे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Home Minister Dilip Walse Patil )  यांनी देखील शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये तासभर मुंबई पोलीस आयुक्त (Mumbai Police Commissioner) हेमंत नगराळे (Hemant Nagarale)  यांच्या सबोत बैठक घेतली आहे. या बैठकीमुळे अनेक चर्चांना उधाण आले असून या बैठकीमागे अनेकतर्क काढले जात आहेत.
Related Posts
1 of 1,640
दरम्यान शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या लय बैठीकीमध्ये कोणत्या विषयावर चर्चा झाली याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र नवाब मलिक विरुद्ध एनसीबी यांच्यात सुरु असलेल्या आरोप – प्रत्यारोपांवर त्या पार्श्वभूमीवर ही बैठक झाल्याची चर्चा झाली असावी असे अनेक तर्क काढले जात आहे. (Important meeting of Home Minister in the presence of Sharad Pawar, many discussions abound)
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: