अवैध गावठी हातभटटी तयार दारुचा साठा जप्त,स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

0 229

अहमदनगर –   पारनेर (Parner) तालुक्यातील अवैध धंदयावर छापे टाकुन २३ हजार रुपये किंमतीचा अवैध गावठी हातभटटी तयार दारुचा साठा अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेने (Local Crime Branch) करून जप्त केला आहे. या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेने ५ आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणात मिळालेली अधिक माहिती अशी कि जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षकसौरभकुमार अग्रवाल,अहमदनगर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनिअनिल कटके व त्यांचे पथकातील पोहेकॉ. भाऊसाहेब काळे, पोहेकों, दत्तात्रय हिंगडे, पोना संदीप दरंदले, पोकॉ. राहुल सोळुंके, पोका, रोहिदास नवगिरे, पोकॉ. शिवाजी ढाकणे, पोकॉ, आकाश काळे असे अवैध धंदयावर कारवाई करणेकामी स्वतंत्र पथक तयार करून कारवाईचा आदेश दिल्याने पारनेर पो स्टे हददीत विशेष मोहीम राबवून सोमवार दि.५ ऑक्टोबर रोजी ०५ ठिकाणी छापे टाकून एकूण २३ हजार रुपये किमतीच्या मुद्देमाल त्यामध्ये गावठी हातभटटीची दारू जप्त करुन खालील प्रमाणे ५ आरोपी विरुध्द पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.

 

Related Posts
1 of 1,603

सदरची कारवाई मनोज पाटील  पोलीस अधीक्षक, अहमदनगर, सौरभकुमार अग्रवाल , अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर, व अजित पाटील उपविभागीय पोलीस अधीकारी, नगर ग्रामीण विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस अधिकारी व अमंलदार यांनी केलेली आहे.

Lakhimpur Kheri, परवानगी नाकारल्यानंतरही राहुल गांधी रवाना

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: