अवैध गावठी हातभट्टी दारू अड्डे उध्वस्त, Dy.s.p संदीप मिटके व त्यांचे पथकाची कारवाई

0 255
श्रीरामपूर  -:   Dy.s.p संदीप मिटके (Dy.s.p Sandeep Mitke ) व त्यांचे पथकाने कारवाई करून श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथील अवैध गावठी हातभट्टी दारू अड्डे उध्वस्त करून १ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे . या कारवाईत ४ आरोपीविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
या प्रकरणात मिळालेली अधिक माहिती अशी कि १० सप्टेंबर रोजी Dy.s.p. संदीप मिटके यांना गुप्त बातमीदारा मार्फत  श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव आऊटसाईड येथे गावठी हातभट्टी दारू अड्डे व  हातभट्टी दारू तयार करत आहेत अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने त्यांनी आपले पथकातील अधिकारी व अंमलदार यांना सदर ठिकाणी  जाऊन छापा टाकण्याचे आदेश दिल्याने पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी हरेगाव आऊट साईड परिसरातील सर्व गावठी हातभट्टी दारू अड्ड्यावर छापा टाकून  गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन, तयार गावठी हातभट्टी दारू यांचा नाश केला.
या कारवाईत पोलिसांनी अशोक बाबुराव गायकवाड, सुधीर काशिनाथ गायकवाड,अशोक रामभाऊ गायकवाड, संतोष चंद्रभान गायकवाड या आरोपींकडून प्रोहिबिशन गुन्ह्याचा माल जप्त केला असून सर्व आरोपींविरुद्ध श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन येथे, मुंबई दारूबंदी कायदा कलम 65 ( फ) (क) (ड )  (ई)  प्रमाणे  गुन्हे दाखल करण्यात आले आहे. अचानक झालेल्या व लागोपाठ सुरू असलेल्या कारवाईमुळे हरेगाव आऊटसाईड परिसरातील अवैध धंदे चालकाचे धाबे दणाणले असून सदर कारवाई चे हरेगाव येथील महिलांनी  Dy.s.p. संदीप मिटके व त्यांचे पथकाचे कौतुक  करून आभार व्यक्त केले.
Related Posts
1 of 1,608
सदरची कारवाई मनोज पाटील पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक डॉ. दिपाली काळे, यांचे मार्गदर्शनाखाली  Dy.s.p  संदीप मिटके, ASI.राजेंद्र आरोळे,H.c. सुरेश  औटी, पो. कॉ. नितीन शिरसाठ, लक्ष्मण  राऊत, अमोल गायकवाड, प्रवीण भोजे, आर सी पी पथक आदींनी केली आहे.
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: