अवैध गावठी हातभट्टी दारूअड्डे उध्वस्त , Dy.s.p संदीप मिटके व त्यांचे पथकाची कारवाई

0 150

अहमदनगर –    श्रीरामपूर तालुक्यातील  खैरी निमगाव येथील अवैध गावठी हातभट्टी दारू अड्डे उध्वस्त Dy.s.p संदीप मिटके (Dy.s.p Sandeep Mitke ) आणि त्यांचे पथकाची कारवाई. या कारवाईत एक लाख दोन हजार रुपयांचे मुद्देमाल जप्त करून दोन आरोपीविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
अधिकमाहिती अशी कि १२ सप्टेंबर रोजी  Dy.s.p. संदीप मिटके यांना गुप्त बातमीदारा मार्फत  श्रीरामपूर तालुक्यातील खैरी निमगाव येथे गावठी हातभट्टी दारू अड्डे व  हातभट्टी दारू तयार करत आहेत  अशी  खात्रीशीर माहिती मिळाल्याने त्यांनी आपले पथकातील अधिकारी व अंमलदार यांना सदर ठिकाणी  जाऊन छापा टाकण्याचे आदेश दिल्याने पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी  खैरी निमगाव परिसरातील सर्व गावठी हातभट्टी दारू अड्ड्यावर छापा टाकून  गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन, तयार गावठी हातभट्टी दारू यांचा नाश करण्याचे आदेश दिले.

या कारवाईत पोलिसांनी  मेश धोंडीराम गायकवाड (वय 35 रा. खैरी निमगाव), अर्जुन केशव गायकवाड या आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून त्यांच्याजवळून  एक लाख दोन हजार किमतीचा प्रोहिबिशन गुन्ह्याचा माल  जप्त केला असून सर्व आरोपींविरुद्ध श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन येथे, मुंबई दारूबंदी कायदा कलम 65 ( फ) (क) (ड )  (ई)  प्रमाणे  गुन्हे दाखल करण्यात आले आहे.अचानक झालेल्या व लागोपाठ सुरू असलेल्या कारवाईमुळे खैरी निमगाव परिसरातील अवैध धंदे चालकांचे धाबे दणाणले असून सदर कारवाई चे  खैरी निमगाव येथील महिलांनी  Dy.s.p. संदीप मिटके व त्यांचे पथकाचे कौतुक  करून आभार व्यक्त केले.

हे पण पहा – वॉर्ड बॉयची रुग्णाच्या नातेवाईकांना शिवीगाळ करत धक्काबुक्की  

Related Posts
1 of 1,301

सदरची कारवाई  मनोज पाटील पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक डॉ. दिपाली काळे, यांचे मार्गदर्शनाखाली  Dy.s.p  संदीप मिटके, ASI.राजेंद्र आरोळे,H.c. सुरेश  औटी,  पो. कॉ. नितीन शिरसाठ चा. पो. कॉ.  रवींद्र लगड, आर सी पी पथक आदींनी केली.

राज्यात मंदिरांचे दरवाजे कधी उघडणार राजेश टोपे म्हणाले …..

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: