हनुमान मंदिरात इफ्तारचं आयोजन; राष्ट्रवादीकडून मनसेला उत्तर ?

0 345
Iftar at Hanuman Temple; Answer from NCP to MNS?
पुणे – मनसे (MNS)अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदींवरील भोंग्या विरोध घेतलेल्या भूमिकेनंतर राज्याचा राजकीय पारा चांगलंच तापला आहे. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून(NCP) पुणेमध्ये (Pune) हनुमान जयंतीच्या (Hanuman Jayanti) प्रसादाने मुस्लिमांचा आजचा रोजा सोडवण्यात (Iftar)येणार आहे. पुण्यातील साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंदिरात आज संध्याकाळी या इफ्तारचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोप सुरु होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुण्यात दाखल झाले असून ते उद्या हनुमान जयंती निमित्त खालकर चौक मारुती मंदिरात महाआरती करणार आहे. तसेच यावेळी सामूहिक हनुमान चालिसा पठण केलं जाणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस रविंद्र माळवदकर आणि भाई कात्रे यांनी या रोजा इफ्तारचे आयोजन केलं असून ज्येष्ठ साहित्यिक आणि अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस हे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. यासोबतच राष्ट्रवादीचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप, शिक्षण महर्षी पी ए इनामदार, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, अप्पर पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे, पोलीस आयुक्त प्रियांका नारनवरे, सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश गोयेकर देखील उपस्थित असणार आहे.

पुण्यातील सोमवार पेठेत असणाऱ्या साखळीपीर राष्ट्रीय मारुती मंदिराच्या विश्वस्तांमार्फत मागील ३५ वर्षांपासून मुस्लिमांसाठी रोजा इफ्तार कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येत आहे. यंदादेखील हनुमान जंयतीच्या पूर्वसंध्येला रोजा इफ्तार कार्यक्रमाच आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी विविध पदार्थ ठेवले जाणार आहेत. साखळीपीर राष्ट्रीय मारुती मंदिराचं वैशिष्टय़ म्हणजे तिथे गणपती आणि हनुमानाची मूर्ती असून आतील बाजूस पीर दर्गा आहे. मुस्लीम पीराचा दर्गा आणि हनुमान मंदिर एकत्रित असल्याने या तालमीला साखळीपीर तालीम म्हटलं जातं. या ठिकाणी विविध समाजातील भाविक दर्शनाला येत असतात आणि इफ्तार कार्यक्रमास हजेरी लावतात.

Related Posts
1 of 2,452

भाजपाची टीका

“नास्तिक शरद पवार यांच्या पक्षाकडून पुण्यातील साखळीपीर हनुमान मंदिरात इफ्तार पार्टी होणार आहे. ही कोणत्या प्रकारची नास्तिकता आहे? हा सरळ हिंदू धर्माच्या श्रध्देवर घाला आहे. राष्ट्रवादीचा जाहीर निषेध! समस्त हिंदूंनी याचा निषेध करावा!,” असं ट्विट भाजपाने केलं आहे.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: