DNA मराठी

“धार्मिक कार्यक्रम करायचे असतील तर..”राणा दाम्पत्याच्या ‘त्या’ भूमिकेवर शरद पवारांची टीका

0 220
"If you want to do religious programs .." Sharad Pawar's criticism on the 'that' role of the Rana couple

पुणे  –  मागच्या काही दिवसांपासुन राज्यात हनुमान चालीसावरून (Hanuman Chalisa) राजकारण सुरु आहे. शनिवारी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा पठण करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर  शिवसैनिक आक्रमक झाले होते. यानंतर पोलिसांनी राणा दांपत्याला अटक केली. हे दाम्पत्य सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.

याच प्रकरणावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष आणि खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ते आज पुणे येथे पत्रकारांशी बोलत होते. एखाद्या धर्मासंबंधी किंवा विचारासंबंधी प्रत्येक व्यक्तीच्या भावना असतात. त्या भावना आणि विचार आपल्या अंत:करणात आणि घरातच ठेवायच्या असतात, असं शरद पवार म्हणाले आहेत. आपण आपल्या धार्मिक भावनांचे प्रदर्शन करायला लागलो आणि त्याआधारे अध्य घटकासंबंधी द्वेष पसरवला तर त्याचे परिणाम समाजावर दिसायला लागतात. महाराष्ट्रात हे कधीही होत नव्हतं, असंही ते म्हणाले.

भावना त्यांनी अंतकरणात, घरात ठेवाव्यात. पण आपण त्याचं प्रदर्शन करु लागलो. त्याच्या आधारे अन्य घटकांसंबंधी एक प्रकारचा द्वेष वाढेल असे प्रयत्न केले तर त्याचे दुष्परिणाम समाजाला दिसू लागतात. महाराष्ट्रात असं कधी होत नव्हतं. अलीकडच्या काळात महाराष्ट्रात अशा वैयक्तिक अशा गोष्टी होत असून मला त्याचं आश्चर्य वाटतं.

Related Posts
1 of 2,482

”बाळासाहेब ठाकरे आणि माझ्यात देखील जाहीर मतभेद होते”

मी इतकी वर्षे महाराष्ट्रात काम केलं आहे. बाळासाहेब ठाकरे आणि माझ्यातही जाहीर मतभेद होते. आम्ही एकमेकांविरुद्ध शब्द वापरताना कधीही काटकसर केली नाही. मात्र बैठक संपल्यांतरबैठक संपल्यानंतर संध्याकाळी आम्ही एकमेकांच्या घऱी असायचो. अनेकदा औरंगाबादला सभा झाल्या होत्या. त्यावेळी आम्ही विरोधकांवर तुटून पडायचो. सभा संपल्यानंतर आमची संध्याकाळ ज्येष्ठ नेते बापू काळदाते आणि अनिल भालेराव यांच्यासोबत जायची. तेव्हा आपण सभेत काय बोललो, याचे स्मरणही होत नसे. महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाण यांच्यापासून ही परंपरा सुरु होती, अशी आठवण शरद पवार यांनी यावेळी सांगितली.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: