“तू माझ्याशी बोल नाही तर..” युवतीचा विनयभंग; तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल

0 291
"If you don't talk to me ..." Filed at Tof Khana Police Station

प्रतिनिधी DNA मराठी टीम 

अहमदनगर –  कॉलेज (College) संपल्यानंतर घरी जात असताना युवतीचा हात पकडून तिचा एका तरुणाने विनयभंग केल्याची घटना अहमदनगर शहरातील  बालिकाश्रम रोडवर घडली आहे. या प्रकरणात युवतीच्या फिर्यादीवरून शुभम शंकर काकडे (रा. तपोवन रोड, अहमदनगर) या तरुणाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

Related Posts
1 of 2,420
अहमदनगर शहरातील एका उपनगरात राहणारी फिर्यादी युवती पारनेर तालुक्यातील एका कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे. गुरूवारी सायंकाळी युवती आणि तिचे मित्र-मैत्रीण कॉलेज संपल्यानंतर बसने पारनेर येथून अहमदनगर शहरातील नेप्ती नाका येथे आले.
तेथून युवती तिच्या दुचाकीवरून घराकडे जात असताना शुभम काकडे याने तिला बालिकाश्रम रोडवर दुचाकी आडवी लावली आणि ‘तु माझ्याशी का बोलत नाही? असे म्हणून त्याने डावा हात पकडून विनयभंग केला.’तु माझ्याशी बोल नाही तर मी तुला त्रास देईल’, अशी धमकी देवुन शिवीगाळ करत तो तेथून निघुन गेला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तोफखाना पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास सुरू केला आहे.
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: