तुम्ही तुमची लक्ष्मणरेषा ओलांडली तर …; राणा दांपत्याला संजय राऊतांचा इशारा

0 166
If you cross your target line; Sanjay Raut's warning to Rana couple
 नागपूर  – सध्या राज्यात हनुमान चालीसावरून राजकारण सुरू आहे. यावरूनच राणा दांपत्य (Rana couple)आणि शिवसैनिक आमने-सामने आले  आहेत. राणा दांपत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांच्या मातोश्री या निवासस्थानी हनुमान चालीसा पठण करण्याचा इशारा दिल्यापासून शिवसैनिक आक्रमक झाले आहेत
 आज शनिवारी  नऊ वाजताच राणा यांच्या खार येथील निवासस्थानाबाहेर असलेले बॅरिकेट्स तोडून शिवसैनिक इमारतीत घुसले आहेत. शिवसैनिकांना रोखण्याचा प्रयत्न यावेळी पोलिसांकडून करण्यात आला. मात्र नवनीत राणा आणि रवि राणा मातोश्री बाहेर जाऊन हनुमान चालीसा पठण करण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत. यावर शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut)यांनी नागपूर येथे माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.
Related Posts
1 of 2,352

“या घटनेकडे एक शिवसैनिक म्हणून जसे पाहायला हवे तसेच मी पाहत आहे. कोणाच्यातरी पाठबळाने तुम्ही मातोश्रीमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत असाल तर शिवसैनिक शांत बसतील का? सरकारने आणि मुख्यमंत्र्यांनी काय करावे हे सल्ले तुमच्याकडून ऐकून अंमलबजावणी करण्याचा भिकारीपणा महाराष्ट्राला आलेला नाही,” असे संजय राऊत म्हणाले.

तुम्ही तुमची लक्ष्मणरेषा ओलांडली तर शिवसैनिकांना सुद्धा संतापून तुमच्या घरापर्यंत घुसण्याचा अधिकार आहे. राष्ट्रपती राजवट लागेल, केंद्रीय तपास यंत्रणा येतील या धमक्या आम्हाला देऊ नका. या क्षणी शिवसैनिकांवर कोणाचेही नियंत्रण नाही. अजून सुरुवात झालेली नाही. मुंबईत दोन दिवसांत घडलेल्या घटना या जनतेच्या भावनेचा स्फोट आहे. तुम्ही आमच्या घरात घुसण्याचा प्रयत्न कराल तर तुम्हालाही घरे आहेत हे लक्षात ठेवा,” असा इशारा संजय राऊत यांनी दिला.

“केंद्रीय पोलीस बलाचा वापर करुन आमच्या घरात घुसण्याचा प्रयत्न कराल तर आम्हाला रक्षणासाठी पोलिसांची गरज नाही. शिवसैनिक यासाठी सक्षम आहे. शिवसैनिक सदैव मरायला आणि मारायला तयार असतो. सरकार असल्यामुळे आमचे हात बांधलेले आहेत. केंद्र सरकार पुरस्कृत तुमच्या झुंडशाहीला शिवसैनिकांनी उत्तर दिले तर तुम्हाला मिरच्या का झोंबत आहे. तुम्ही आमच्यावर हात उगारण्याचा प्रयत्न केला तर शिवसैनिक शांत बसणार नाही,” असेही संजय राऊत म्हणाले.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: