व्हाट्सअप वापरत असेल तर सावधान! नाही तर…..

0 466
नवी मुंबई –   जगातील सर्वात जास्त लोकप्रिय सोशल नेटवर्किंग साईड (Social Networking Side) म्हणजे व्हाट्सअप (WhatsApp) ही होय. या व्हाट्सअपचा आपल्या दैनंदिन जीवनात रोज वापर होतो. कोण्ही या व्हाट्सअपचा वापर आपल्या मित्रांबरोबर गप्पा मारण्यासाठी करतो तर कोण्ही आपल्या काम निमित्त याचा वर करत असतात. मात्र हे व्हाट्सअप वापरताना सतर्क राहण्याची गरज आहे. कारण व्हाट्सअप वापरून फ्रॉड (Fraud) करण्यासाठी हॅकर्सकडून (Hackers) नवीन पद्धतीचा वापर केला जात आहे.
व्हाट्सअप ने आपल्या यूझरला (Users )आता ‘Friend In Need‘ स्कॅमबाबत इशारा दिला आहे. व्हाट्सअप ने दिलेल्या माहितीनुसार, जवळपास 59 टक्के लोकांसोबत मेसेजद्वारे अशी फसवणूक झाली आहे. ‘Stop. Think. Call’ कँपेन – WhatsApp ने आता नॅशनल ट्रेडिंग स्डँडर्ड्ससह भागीदारी केली आहे. जेणेकरुन युजर्सला स्कॅम आणि इतर अशा फ्रॉडबाबत इशारा दिला जाऊ शकेल. ‘Stop. Think. Call’ कँपेनचा उद्देश लोकांना सायबर क्रिमिनल्सद्वारा फ्रॉडपासून वाचवणं, त्याबाबत माहिती देणे असा आहे.
या कँपेनचा उद्देश कोणत्याही मेसेजला उत्तर देण्याआधी थांबा आणि तुमचं टू-फॅक्टर ऑथेटिंकेशन ऑन आहे का हे तपासा, यामुळे अकाउंट सुरक्षित ठेवण्यास मदत होते. आलेल्या लिंक, मेसेजबाबत विचार करा. आलेल्या लिंकमध्ये पैसे, खासगी माहिती तर मागितली जात नाही ना हे तपासा. तसंच एखाद्या मित्राच्या नावाने, कुटुंबियांच्या नावाने पैसे मागितले जात असल्यास त्या व्यक्तीला फोन करुन आधी चौकशी करा.असा Stop. Think. Call या कँपेनचा उद्देश आहे.
 
काय आहे Friend In Need Scam  
या स्कॅममध्ये सायबर क्रिमिनल्स अशा व्यक्तीचं खातं हॅक करतात, ज्याला तुम्ही ओळखता. त्यानंतर तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमधील अनेक लोकांना मेसेज पाठवले जातात. फोन हॅक झाल्यामुळे हॅकर्स इतरही मेसेज वाचू शकतात. हॅकर्स स्वत: तुमच्या कॉन्टॅक्टमधील व्यक्तींशी चॅट करतात आणि पैशांची मागणी करतात. आपल्याच मित्रांने पैसे मागितले असल्याचं तुम्हाला वाटू शकतं. परंतु हे मेसेज हॅकर्सने केलेले असतात. त्यामुळे कोणीही कोणत्याही व्यक्तीच्या नावाने पैसे मागितल्यास, त्या व्यक्तीला कॉल करुन तपास करणं महत्त्वाचं आहे.
Related Posts
1 of 85
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: