महामार्गावर वाहन चालवताना वाहतुकीच्या नियमाचे पालन केले तर अपघातावर नियत्रंण येईल

0 11

अहमदनगर –   महामार्गावर वाहन चालवताना वाहतुकीच्या नियमाचे पालन केले तर अपघातावर नियत्रंण येईल आपला परीवार सुरक्षित राहू शकतो . बहुतेक अपघात हे वाहन चालवताना मोबाईल वर बोलताना झालो आहे . शरीर अनमोल आहे . वाहन चालवताना झालेल्या थोडयाशा चुकीमुळे अपघात झाला तर आपले परीवार संकटात येते आयुष्यभर परीवाराचे सांभाळ करण्यासाठी सामना करावा लागतो यासाठी काळजी पूर्वक वाहन चालवावे असे प्रतिपादन  शहर वाहतुक विभागाचे पोलीस निरिक्षक विकास देवरे यांनी केले .

३२ वा रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत ड्राईव्हा सेवा ट्रस्ट महाराष्ट्र प्रदेश कार्यालय व महाराष्ट्र हायवे पोलीस व शहर वाहतुक पोलीस अहमदनगर यांच्या संयुक्त विदयमाने सुरक्षा सप्ताह हा कार्यक्रम  केडगाव अरणगाव बायपास येथे आयोजीत करण्यात आला यावेळी ते बोलत होते . या कार्यक्रमाच्या  अध्यक्षस्थानी मेहेरबाबा ट्रस्टचे रमेश जंगले , सहायक पोलीस निरिश्चक शशीकांत गिरी, शरद दळवी , उत्तर महाराष्ट्र केसरी योगेश पवार, ड्रय०हर सेवा ट्रस्टचे अध्यक्ष गोरख कल्हापुरे, दत्तात्र्य जाधव , उत्तम गाडे , संतोष शिंदे, राजेंद्र धनगर , राजेंद्र ढवण , दत्तात्रय विटेकर , अभयसिंग राठी, अशोक गव्हाणे , पोपट पुंड , सुदाम गव्हाणे , रंगनाथ शिंदे , गणेश परभणे , बाळासाहेब दळवी अतुल कडूस उपास्थित होते . यावेळी देवरे म्हणाले अमली पदार्थ सेवन करुन गाडी चालू नये , सिट बेल्टचा  वापर करावा , वाहन जोरात चालवू नये , धोकादायक पद्धतीने माल वाहतूक करू नये , फोनवर बोलू नये , हेल्मटचा वापर करावा अपघात जखमी झालेल्या दवाखान्यात हलवावे ,पोलीसांना अपघाताची माहीती द्यावी बहुतेक अपघात हे मोबाईल मुळे झाले आहेत . दुचाकी स्वाराचे प्रमाण जास्त आहे . ते०हा प्रत्येक वाहन चालकांनी या नियमाचे पालन केले तर अपघात नियत्रणात येतील असे शहर वाहिक विभागाचे प्रमुख विकास देवरे यांनी वाहन चालकांना मार्गदर्शन केले .

                               अजित पवार यांची परत नॉटरिचेबल होण्याची वेळ आली – निलेश राणे

ड्राय०हर सेवा ट्रस्ट वाहन चालकासाठी नेहमीच प्रत्येक वर्षा वेगवेगळे उपक्रम राबवित असतात . गोरख कल्हापुरे या ट्रस्टच्या माध्यमातून चालकासाठी ज  उपक्रम राबवितात ट्रस्टचे क उपक्रम कौतुकास्पद आहे .  सध्या वाहतुक सप्ताह चालू आते . प्रशासनाच्या वतीने ठिक |ठीकाणी अपघाता वर नियत्रंण आणण्यासाठी जनजागृती केली जात आहे . यासाठी जनतेने प्रशासनाला सहकार्य करावे .

Related Posts
1 of 1,292

 अर्णव गोस्वामी देशप्रेमी आहेत का…. ? – संजय राऊत

यावेळी गिरी म्हणाले अपघात कमी  होण्यासाठी प्रशासन ३१ वर्षापासून वाहतुक सफ्ताहाचे आयोजन करत आहे . सुरवातीला सात दिवस , पंधरा दिवस आता महिना भर वाहतुकी चे नियमाचे पालन करण्यासाठी जनजागृती केली जात आहे ३१ वर्ष कार्यक्रम घेऊन ही अपघाताची सख्या कमी करण्यात यश आलेले नाही . महामार्गावर वाहन चालवताना वेगावर नियत्रंण ठेवावे .मदयपान करुन वाहन चालवू नये तसेच मोबाईल वर बोलू नये असे या वेळी सांगीतले . कल्हापुरे यांनी ट्रस्टच्या वतीने राबवत योजनाची माहिती या वेळी दिली .आमचा वाहन चालक कसा सुरक्षित राहिल याची काळजी घेण्याचे शिबीर मार्गदर्शन वेळोवेळी करत आहे . अपघातामध्ये जखमी झालेल्या तसेच मुत्यू मुखी पडलेल्या कुंटुबाला आर्थाक मदतही ट्रस्ट च्या वतीने दिली जाते असे या वेळी सांगीतले . कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार शरद दळवी यांनी केले .

                                    विधानसभा अध्यक्ष कोण होणार हे मुख्यमंत्री ठरवतील – उदय सामंत

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: