सोन्याच्या दरात घसरण तर चांदीच्या भावात वाढ, जाणून घ्या आजचा भाव

0 354

नवी मुंबई –   मागच्या काही दिवसांपासून सोन्याच्या ( Gold) किमतीत घसरण होत आहे. हि घसरण आज देखील झाली असून आज सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४६ हजार ४९० रुपये इतकी झाली आहे. तर चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ६४६ रुपये आहे . उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात आहे . (If the price of gold falls then the price of silver rises, find out today’s price)

काय आहे आजचा भाव ?

गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४६,४९० रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर कमी झाला आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ४७,४९० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४५,६३० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ४८,८७० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४६,४९० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ४७,४९० रुपये इतका असेल. चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ६४६ रुपये आहे. कालच्या आणि आजच्या दरामध्ये ४ रुपयांचा फरक आहे.

Related Posts
1 of 1,463

हे पण पहा  – कुणाला रुपया भेटू देणार नाही पोलीस स्टेशन ला.नेवासा नंतर पाथर्डी पोलिसांची ऑडियो क्लिप

सोन्याची शुद्धता अशी ओळखावी

२४ कॅरेट सोने सर्वात शुद्ध आहे, पण पूर्ण २४ कॅरेट सोन्याचे दागिने बनविणे शक्य नाही. सामान्यपणे २२ कॅरेट सोन्याचा वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो. ज्यामध्ये ९१.६६ टक्के सोने असते. जर तुम्ही २२ कॅरेट सोन्याचे दागिने घेत असाल तर तुम्हाला हे माहित असले पाहिजे की २२ कॅरेट सोन्यामध्ये २ कॅरेट इतर धातू मिसळले गेले आहेत. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित ५ प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.  (If the price of gold falls then the price of silver rises, find out today’s price)

शाहरुख खानने घेतली आर्यन खानची भेट.., पहा हा व्हिडिओ

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: