नगरसेवक आंदोलनाचा इशारा देत असतील तर महापौरांनी राजीनामा द्यावा….

0 234

अहमदनगर-   शहरातील रस्त्यांवरील पडलेले खड्डे हा एक मोठा विषय या जिल्ह्यात झाला असून या खराब रस्त्यांमुळे  शहरात चालणे सुद्धा अत्यंत धोक्याचे बनले आहे.  परंतु हे सर्व करत असताना ज्यांच्यावर नगरकरांनी जबाबदारी दिली असे सत्तेत असलेल्या शिवसेनेच्या नगरसेवक (corporators) तसेच पदाधिकारी खड्डे बुजवन्या बाबत आयुक्तांना घेराव घालत आहेत . आयुक्तांना आंदोलनाचा इशारा देत आहेत.  महानगरपालिकेच्या इमारतीवरून उडी मारण्याचा इशारा देत आहे.  न भूतो न भविष्यती आंदोलन करण्याचा इशारा देत आहे हे कुठेतरी शिवसेनेतील अंतर्गत वादामुळे हे समोर येत आहे.

अश्याच प्रकारे सत्ताधारी म्हणुन शिवसेनेने काम न करता अंतर्गत गटबाजी मुळे एक गट सत्तेच्या विरोधात आंदोलन करणार असेल व एक गट फक्त बघ्याची भुमिका घेणार असेल तर येणाऱ्या काळात शहर विकासासाठी हि धोक्याची घंटा आहे . परंतु आज नगरकरांनी सर्वात जास्त नगरसेवक शिवसेनेचे निवडून दिले शिवसेनेचे नगरसेवक निवडून दिल्यानंतर सत्ताधारी म्हणून नगरकरांनी शिवसेनेला स्वीकारलं आणि सत्ताधारी स्वीकारल्यानंतर जर शिवसेना शिवसेनेतील पदाधिकारी नगरसेवक आंदोलनाचा इशारा देत असतील तर शिवसेनेच्या महापौर रोहिणी ताई शेंडगे यांना महापौर पदावर राहण्याचा कुठलाही अधिकार राहत नाही.

कृति सेनॉनचा हॉट लुक पाहून फॅन्स म्हणतात ‘हाय मेरी परम सुंदरी’

 जर नगर शहरासाठी सर्व नगरसेवक तसेच सत्ताधारी महापौरांना शहर विकासाचे नियोजन जमत नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा. तुम्हाला सत्ता नगरकरांनी आपापसात भांडण करायला दिली नसुन शहर विकासासाठी दिली आहे संपूर्ण महाराष्ट्रातच खड्यांचा विषय प्रमुख सर्व शहरांमध्ये बनलेला आहे त्यामुळे सर्व नगरसेवक सत्ताधारी शिवसेना महा विकास आघाडी यांनी खरतर नगरच्या रस्त्यात करीता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्याकडे निधीची मागणी करणे गरजेचे आहे महाराष्ट्रात सत्तेत मुख्यमंत्री, नगरविकामंत्री असताना शहरातली रस्त्यांना निधी महापौरांना आणता येत नसेल तर या पदावर बसून काय उपयोग आज परिस्थितीला खड्डे बुजवणे हा नगर शहरातील रस्त्यांचा पर्याय राहिलेला नसून नवीन रस्ते करणे हा एकमेव पर्याय नगर शहरात उरलेला आहे .

Related Posts
1 of 1,518

त्यामुळे कुठेही राज्यात सत्ता असताना आपल्या मंत्र्यांना मागणी न करता पदाधिकारी शिवसेनेतील नगरसेवक महानगरपालिकेतील आयुक्त अधिकाऱ्यांना आंदोलनाचा इशारा देतात हे कुठेतरी दुर्दैवाची गोष्ट आहे त्यामुळे कुठेतरी यांचे नगर विकास मंत्री यांच्याकडे पाठपुरावा करून नगर शहराकरीता नवीन रस्त्यांकडे चा निधी उपलब्ध करून आणावा ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी आहे आणि जर तुमच्यावर निधी उपलब्ध होत नसेल नगर शहरातील रस्ते तुमच्याकडून व्यवस्थित होत नसतील आणि तुमचे नगरसेवक पदाधिकारी असे वारंवार आंदोलनाचा इशारा देत असेल आंदोलनासाठी अहमदनगर शहरात रस्त्यावर उतरत असतील तर सत्ताधारी म्हणून आपल्याला खुर्चीवर महापौरांच्या बसण्याचा कुठलाही अधिकार उरलेला नाही त्यामुळे येणाऱ्या काळात शिवसेनेने सर्व रस्त्याचे खड्डे यांचे प्रश्न मार्गी लावावेत जर प्रश्न मार्गी न लावता त्यांच्यात असलेल्या अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर कुठेतरी एकमेकाला विरोध करायचा आणि कुठेतरी नगर शहराला विकासापासून वेठीस धरायचे असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे कदापिही सहन करणार नाही. असा इशारा मनसेचे जिल्हा सचिव  नितीन भुतारे यांनी दिला आहे.

याची नोंद शिवसेनेच्या महापौरांनी तसेच शिवसेना नगरसेवक पदाधिकाऱ्यांनी घ्यावी महाविकास आघाडीच्या च्या माध्यमातून जर आपल्या कडून कामे होत नसतील तर येणाऱ्या काळात आपण सत्तेत भोगु नये शिवसेना महापौर व नगरसेवक तसेच पदाधिकारी हे अहमदनगर शहरात सत्ताधारी म्हणुन शहरातली विकासाची जबाबदारी आपल्यावर आहे त्यातून आपण पळून जाऊ नका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मनसेचे नितीन भुतारे यांनी शिवसेना महापौर व नगरसेवक यांच्यावर अशी खरमरीत टीका केली आहे. शिवसेनेकडे आता हिंदुत्व राहिलेले नाही हिंदूंचे संरक्षण सुध्दा शिवसेना करू शकत नाही. अंतर्गत गटबाजी मुळे शहरातली विकास सुध्दा करु शकत नाही त्यांचेच नगरसेवक आंदोलनाचा ईशारा देत असल्यामुळे नगरकरांनी आता न्याय मागायचा कोणाकडे असा सवाल मनसेचे नितीन भुतारे यांनी केला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या महापौर रोहिणी ताई शेंडगे यांनी राजीनामा द्यावा. अशी मागणी ही देखील मनसेचे नितीन भुतारे यांनी केली आहे.

हे पण पहा – ग्रामसेवक गवांदे आत्महत्या प्रकरणात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल…

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: