प्रकरण गंभीरतेने घेतले गेले नाही तर पुरावे सार्वजनिक करण्यात येतील – नवाब मलिक

0 245

नवी मुंबई –  क्रुझ ड्रग्ज पार्टी (Cruise Drugs Party) प्रकरणात एनसीबी (NCB) चे अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) आणि पार्टीमध्ये असलेला दाढीवाला ड्रग्ज माफिया यांच्यात दोस्ताना असल्यानेच  त्याला कारवाईतून वगळण्यात आले आणि इतर लोकांना टार्गेट करण्यात आला असून याबाबतचे सर्व सीसीटीव्ही फुटेज चौकशी समितीने तपासावे. जर त्यात त्यांना काही सापडत नसेल तर वरीष्ठ अधिकारी ज्ञानेश्वर सिंग माझ्याकडे आल्यास ते पुरावे द्यायला तयार आहे माझा चौकशी समितीवर सवाल नाही परंतु हे प्रकरण गंभीर असून ते गंभीरतेने घेतले गेले नाही तर पुरावे सार्वजनिक करण्यात येतील असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी एनसीबीला दिला आहे. (If the case is not taken seriously, the evidence will be made public – Nawab Malik)

पत्रकारांशी बोलताना नवाब मलिक म्हणाले  एनसीबीच्या अधिकार्‍याने एक पत्र माझ्याकडे पाठवले होते. ते पत्र डीजी आणि एनसीबीकडे माझ्या लेटरहेडवरुन पाठवले आहे. सीबीसीच्या मार्गदर्शक सूचनेवरुन निनावी पत्राची चौकशी होत नाही. परंतु ज्यापद्धतीने त्या पत्रात उल्लेख करण्यात आला आहे त्याकडे दुर्लक्ष केले तर संपूर्ण यंत्रणेवर प्रश्न उपस्थित होऊ शकतो असा प्रश्न नवाब मलीक यांनी उपस्थित केला.

समीर वानखेडे यांच्या चौकशीसाठी जी समिती आली आहे त्यांनी पंचांना बोलावले आहे. एनसीबी इलेक्ट्रॉनिक पुराव्याआधारे कारवाई करते असे सांगितले जाते. प्रभाकर साहीलने संपूर्ण घटनेबाबत प्रतिज्ञापत्र व व्हिडीओ करून प्रसारित केला आहे. चौकशी समितीने समीर वानखेडे, के. पी. गोसावी, प्रभाकर साहील आणि वानखेडे यांचा ड्रायव्हर माने या सर्वांचा सीडीआर काढावा, अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली आहे.

ज्या गाडीचा वापर ५० लाख रुपये नेण्यासाठी करण्यात आला ती गाडी आणि ज्यापद्धतीने सॅम डिसुझा यांच्याकडे पैसे देण्यात आले हे बघता त्यांचा जबाब घेण्याची आवश्यकता नाही. कारण एनसीबी इलेक्ट्रॉनिक पुराव्यांच्या आधारे चौकशी करते. त्यामुळे सीडीआर काढल्यास सर्व सत्य समोर येईल. एवढी मोठी देशाची एजन्सी आहे. आमच्यापेक्षा चार पावले अधिक काम करत असेल तर मी ज्याबाबत इशारा करत आहे त्याविषयाकडे ते लक्ष देतील, असेही नवाब मलिक म्हणाले.

एनसीबीने एक वर्षापूर्वी एक एफआयआर दाखल केला होता. त्यामध्ये एकालाही अटक झालेली नाही. त्या एफआयआरवरुन दीपिका पदुकोण, सारा अली खान यांना चौकशीला बोलावण्यात आले मात्र अटक करण्यात आली नाही. हे सर्व खोटं असेल तर त्यावेळी मीडियाने दाखवलेले फुटेज बघावे आणि खोलात जाऊन चौकशी करावी. मालदीव दौर्‍याकडे लक्ष दिल्यास मालदीवमध्ये कोण कोण अभिनेता आणि अभिनेत्री होते हा सगळा खेळ समोर येईल, याकडेही नवाब मलिक यांनी लक्ष वेधले.

क्रुझ प्रकरणातील चौकशी भरकटवण्यासाठी नवाब मलिक गेले २० दिवस वेगवेगळ्या गोष्टी समोर आणत आहेत असा आरोप काही लोक करत आहेत. मात्र मी माझं काम करत आहे. ज्या गोष्टी खोट्या आहेत त्या समोर आणत आहे. ज्यांनी डोळ्यावर पट्टी बांधली आहे त्यांची पट्टी काढणं हे कर्तव्य आहे, असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.

Related Posts
1 of 1,518

हे पण पहा – येसवडी गावातील अनाधिकृत हातभट्टी आणि दारु विक्रीवर कारवाई व्हावी

क्रुझवरील पार्टी ही फॅशन टिव्हीने आयोजित केली होती. राज्य सरकारच्या परवानगीशिवाय आणि कोविड नियमांचे पालन न करता थेट शिपींग डायरेक्टरची परवानगी घेऊन पार्टी करण्यात आली. जहाजावर टार्गेट करून काही लोकांचे फोटो घेऊन ट्रॅक करण्यात आले. त्या पार्टीत एक आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफिया होता. त्याच्यासोबत त्याची गर्लफ्रेंड होती, ती हातात रिव्हॉल्व्हर घेऊन उपस्थित होती. तिथल्या रेव्ह पार्टीत नाचताना एक दाढीवाला आहे, तो दाढीवाला कोण हे एनसीबीच्या अधिकार्‍यांना माहीत आहे, असा खळबळजनक गौप्यस्फोट नवाब मलिक यांनी केला.जे चौकशी अधिकारी आले आहेत त्यांनी क्रुझवरील सर्व सीसीटीव्ही फुटेज चेक केले तर त्यांना त्या पार्टीत आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफिया उपस्थित होता हे दिसेल. खेळ तर झाला परंतु खेळाचा खेळाडू गाडी घेऊन का फिरत आहे याचे उत्तर एनसीबीने द्यावे. आज  जे बोलत आहे त्याचे पुरावे येत्या काही दिवसात समोर ठेवणार असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले.

एका जाहीर सभेत बोलताना समीर वानखेडेची नोकरी जाईल आणि तो तुरुंगात असेल असे वक्तव्य केले होते. त्यावेळी मी कोणत्याही पोलीस यंत्रणेचा वापर केला नव्हता. मी समीर दाऊद वानखेडे याच्या धर्माबाबत प्रश्न उपस्थित केलेला नाही. समीर दाऊद वानखेडे याने फर्जी दस्ताऐवजाच्या आधारावर अनुसूचित जातीचा दाखला बनवून  IRS ची नोकरी मिळवली आणि एका गरीब दलित मुलाचा अधिकार हिरावून घेतला, हा मुद्दा मी उपस्थित केला आहे. मी कुठल्याही धर्माची चर्चा केली नाही. समीर वानखेडेचा जो फर्जीवाडा आहे,  फर्जी पद्धतीने दाखला बनवून त्या आधारावर नोकरी घेतली,  मी शेअर केलेला जन्मदाखला फर्जी आहे असे ते बोलत आहेत तर खरा दाखला कुठे आहे, हे वानखेडे यांच्या कुटुंबातील लोकांनी सांगितले पाहिजे, असेही नवाब मलिक म्हणाले.(If the case is not taken seriously, the evidence will be made public – Nawab Malik)

समीर वानखेडे प्रकरणात मुंबई पोलिसांची एन्ट्री, नांगरे पाटीलांनी दिला “हा”आदेश

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: