शिवसेना किंवा काँग्रेस सोडली नसती तर आज मुख्यमंत्री नक्कीच झालो असतो – भुजबळ

0 2,109
 नाशिक – राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री (Minister of Food and Civil Supplies) आणि नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी आज आपल्या ७५ व्या वाढदिवसा निमित्त आयोजित एका कार्यक्रमात मोठा गौप्यस्फोट करत आपल्या मनातील मनातली खंतही व्यक्त केली आहे.जर मी शिवसेना ( Shiv Sena ) किंवा काँग्रेस ( Congress ) सोडली नसती तर आज मुख्यमंत्री नक्कीच झालो असतो, अशी भावना छगन भुजबळांनी व्यक्त केली आहे.(If Shiv Sena or Congress had not left, Bhujbal would have become the Chief Minister today- Bhujbal)

ज्यांच्या सभेत आपण भाषणं दिली, ते आज मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री झाले आहेत. माझे अनेक सहकारी पुढे गेले. मी मुख्यमंत्री किंवा केंद्रीय मंत्री होऊ शकलो नाही. त्याबद्दल आता खंत व्यक्त करण्यात अर्थ नाही, असं छगन भुजबळ म्हणाले आहेत. तसंच मी शिवसेना किंवा काँग्रेस सोडली नसती तर आज नक्कीच मुख्यमंत्री झालो असतो, अशी भावनाही त्यांनी यावेळी बोलून दाखवली.

काँग्रेस नेतृत्त्वानं एकेकाळी संपर्क करुन आपल्याला मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती, असा गौप्यस्फोट भुजबळांनी केला आहे. मात्र ओबीसींच्या न्याय्य हक्कांसाठी शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ राहण्याचा निर्णय घेतला होता,असंही त्यांनी म्हटलं आहे. शिवसेना सोडतानाचा काळ सर्वांत कठीण होता, अशी भावना त्यांनी बोलून दाखवली. पण ओबीसींच्या न्याय्य हक्कांसाठी मला शिवसेना सोडावी लागली, असंही त्यांनी बोलून दाखवलं आहे.

 हे  पण पहा –   शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्या… | आ. मोनिका

शिवसेना सोडण्याचे तोटेही मला सहन करावे लागले. शिवसेना सोडली नसती, तर शिवसेनेचा पहिला मुख्यमंत्री मीच राहिलो असतो. मातोश्रीवर गेल्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीच मला हे सांगितले होते, असंही भुजबळांनी सांगितलं.

मुख्यमंत्रीपदापेक्षाही ओबीसींना आरक्षण मिळवून दिले, हा माझ्यासाठी मोठा आनंद आहे, असं ते म्हणाले.शरद पवारांसोबत काँग्रेस सोडतानाही दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदासाठीची संधी चालून आली होती. तेव्हा विलासराव देशमुख विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले होते. काँग्रेसच्या नेतृत्वाने मला मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली, हे देखील भुजबळांनी सांगितलं आहे. सोनिया गांधींचे सचिव व्ही. जॉर्ज यांच्यासह शीला दीक्षित, राजेश पायलट यांनी माझ्याशी संपर्क करून परत येण्याची सूचनाही केली. मात्र मी पवारांसोबतच कायम राहायचे ठरविले, असं छगन भुजबळ म्हणालेत.(If Shiv Sena or Congress had not left, Bhujbal would have become the Chief Minister today- Bhujbal)

मोठी बातमी ! मालगाडी रुळावरून घसरून मोठा अपघात, चालक आणि गार्ड सुरक्षित

Related Posts
1 of 1,512
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: