
मुंबई – मागच्या काही दिवसांपासून राज्यात चर्चेत असलेल्या अमरावतीचे खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. BMC ने त्यांना धक्का देत मुंबईतील खार येथील असलेल्या निवासस्थानाचे बांधकाम अनाधिकृत असल्याचं सांगत नोटीस दिली आहे.
तसेच १५ दिवसांच्या आत हा बांधकाम पाडावं नाहीतर कारवाई करण्यात येईल अशा इशारा देखील पालिकेने त्यांना दिला आहे. राणा दाम्पत्यांचा खार येथे असलेल्या एका अपार्टमेंटमध्ये फ्लॅट आहे. त्या अपार्टमेंटचे बांधकाम अनाधिकृत असल्याचं महापालिकेने सांगितलं होतं. त्यानंतर राणा दाम्पत्याला ७ दिवसांची कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली होती. त्या नोटीसीची मुदत संपली असून महापालिकेने पुन्हा एकदा राणा दाम्पत्याला इशारा केला आहे. कारणे दाखवा नोटीसीला राणा दाम्पत्यांनी उत्तरे दिली होती. ती उत्तरे पालिकेने अमान्य करत इशारा केला आहे. दरम्यान महापालिका बांधकाम अनाधिकृत असल्याच्या मुद्द्यावर ठाम आहे.
राणा दाम्पत्यांनी उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या खासगी निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा पठणाचा इशारा दिला होता. त्यानंतर त्यांना शिवसैनिकांकडून विरोध करण्यात आला होता. राणा दाम्पत्यांवर वाद पेटवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पालिकेने त्यांच्या राहत्या घराचे बांधकाम अनाधिकृत असल्याचं सांगत नोटीस पाठवली होती.
त्या नोटीसीची मुदत संपल्यावर पुन्हा महापालिकेने इशारा केला आहे. पुढील १५ दिवसांच्या आत राणा दांपत्यानं बांधकाम पाडावे नाहीतर कारवाई करण्याचा पालिकेने इशारा केला आहे. दरम्यान याप्रकरणी राणा दाम्पत्य कोर्टात जाऊ शकते किंवा पालिकेच्या इमारत प्रस्ताव विभागाकडे नियमिततेचा अर्ज करू शकते.