चीनने भारतावर आक्रमण केल्यास तर…; अमेरिकेने दिला भारताला इशारा

0 460
If China invades India then…; US warns India

प्रतिनिधी DNA मराठी टीम 

मुंबई –   रशिया आणि युक्रेन (Russia and Ukraine) यांच्यादरम्यान सुरू असलेल्या युद्धामुळे रशिया आणि अमेरिका यांच्यात मोठा वाढ सुरु झाला आहे. यातच आता अमेरिकेने (America) रशियाबद्दल इशारा दिल्याने वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.  अमेरिकेचे उप राष्ट्रीय सुरक्षा सल्लगार दलीप सिंह यांनी भारताला इशारा देताना चीन आणि रशियाच्या मैत्रीपासून सावध राहण्यास सांगितलंय. चीनने एलओसीचं उल्लंघन केलं तर रशिया भारताच्या बाजूने उभा राहील असा विचार करु नये असं दलीप सिंह यांनी म्हटलं आहे.

Related Posts
1 of 2,357
अमेरिकेचे उप राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार काही दिवसांमध्ये भारत दौऱ्यावर येणार आहेत. त्यापूर्वीच त्यांनी केलेलं हे वक्तव्य फार महत्वाचं मानलं जात आहे. यापूर्वी भारताचे परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला यांनी त्यांची भेट घेतली आहे. या मुलाखतीनंतरच दलीप सिंह यांनी भारताने रशिया-चीन यांच्या मैत्रीची दखळ घेणं गरजेचं असल्याचं म्हटलं.
रशिया आणि चीनमधील मैत्रीचं नातं हे फार घट्ट असून हे दोन्ही देश मित्रराष्ट्र आहेत असं दलीप यांनी म्हटलंय. दलीप सिंह यांनी इशारा दिलाय की जर चीनने भारतावर हल्ला केला तर भारताने या भ्रमामध्ये राहू नये की त्यांचा जुना मित्र असणारा रशिया हा भारताच्या बाजूने उभा राहील. कारण सध्या चीन आणि रशिया हे अधिक जवळ आलेत, असं दलीप सिंह यांनी अप्रत्यक्षपणे म्हटलंय. अमेरिकन उप राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार दलीप सिंह यांनी भारताने रशियाकडून तेल किंवा इतर गोष्टींसंदर्भात व्यवहार करताना घाई करु नये असं आमचं मत असल्याचं स्पष्ट केलंय. दलीप सिंह यांनी रशियासोबतचा व्यापार हा आंतरराष्ट्रीय निर्बंधांमध्ये येतो. रशियाने युक्रेनवर गरज नसताना हल्ला केल्याने अनेक देशांनी रशियावर निर्बंध लादलेत. सध्या भारत रशियासोबत करत असणारा व्यापार हा या निर्बंधांचं उल्लंघन करणारा असल्याचं दलीप सिंह यांनी अप्रत्यक्षपणे म्हटलंय.
दलीप सिंह यांनी भारताला इशारा देताना, “जर चीनने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचं उल्लंघन केलं तर रशियाकडून आपल्याला देशाच्या सुरक्षेसाठी मदत होईल अशी अपेक्षा भारताने ठेऊ नये. कारण रशिया आणि चीन यांचे संबंध आता घनिष्ठ झाले आहेत,” असं म्हटलंय. दलीप सिंह यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना हे वक्तव्य केलंय. दलीप सिंह यांनी आंतरराष्ट्रीय निर्बंधांकडे कानाडोळा करुन रशियाकडून स्वस्तामध्ये वस्तू खरेदी करण्याचा विचार करत असणाऱ्या देशांनाही इशारा दिला.
मात्र त्याचवेळी दलीप सिंह यांनी भारतासारख्या मित्रराष्ट्रांसोबत अमेरिका कोणत्याही प्रकारच्या निर्बंध धोरणांचं समर्थन करत नाही, असंही स्पष्ट केलं. म्हणजेच रशियासोबत सुरु असणाऱ्या भारताच्या व्यापारामुळे अमेरिका आणि भारताच्या संबंधांवर परिणाम होऊ नये अशीच अमेरिकेची भूमिका असल्याचे ते म्हणाले. याच कारणामुळे दिल्लीतील अधिकाऱ्यांसोबत दलीप सिंह यांनी जागतिक शांतता आणि सुरक्षेसंदर्भातील विषयांवर चर्चा केल्याचं स्पष्ट करण्यात आले.
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: