सेक्ससाठी विचारणे MeToo असेल तर…, ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याच्या वादग्रस्त विधान

प्रतिनिधी – DNA मराठी टीम
मुंबई – मागच्या काही वर्षांपासून #MeToo या मोहिमेमुळे बॉलीवूडमध्ये (Bollywood) अनेक धक्कादायक खुलासे झाले आहे. या मोहिमे अंतर्गत बॉलीवूडमध्ये महिलांविरोधात होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडला जात आहे.आता पर्यंत बॉलीवूडमधील अनेक मोठ्या व्यक्तींचे नाव समोर आले आहे. मात्र आता या मोहिमेवर एका प्रसिद्ध अभिनेत्याने वादग्रस्त विधान केल्याने एकच खळबळ उडाली आहे. तामिळ आणि मल्याळम चित्रपट अभिनेता विनायकन (Actor Vinayakan) याने ‘मी टू’बाबत वादग्रस्त विधान केले आहे.
सध्या सोशल मीडियावर या विधानामुळे खूप चर्चेत आहे. विनायकन हा सध्या त्याच्या ‘ओरुथी’ (Oruthee) या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यातच ‘MeToo’ बाबत केलेल्या वादग्रस्त विधानामुळे सध्या सोशल मीडियावर त्याची चर्चा सुरु आहे. नुकतंच त्याने ‘ओरुथी’ (Oruthee) या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हजेरी लावली. यावेळी त्याला ‘MeToo’ मोहिमेबद्दल प्रश्न विचारण्यात आले. यावेळी तो म्हणाला की, “मला ‘MeToo’ या मोहिमेबद्दल काहीही माहिती नाही. पण महिलांना सेक्ससाठी विचारणे म्हणजे ‘MeToo’ असेल, तर मी हे करत राहिन.”
विनायकनने या प्रश्नावर उत्तर देताना वादग्रस्त वक्तव्य केले आहे. “MeToo म्हणजे काय? मला त्याबद्दल माहिती नाही. मला त्याबाबत जाणून घ्यायचे आहे. जर मला एखाद्या स्त्रीसोबत सेक्स करायचा असेल तर मग काय? मी माझ्या आयुष्यात १० महिलांसोबत शारीरिक संबंध ठेवले आहेत. मी त्या सर्व महिलांना माझ्याशी संबंध ठेवायला आवडतील का? असे विचारले होते. मी अजूनही त्यांना याबाबत विचारेन, यालाच ‘MeToo’ असे म्हणतात का?” असे तो म्हणाला.
दरम्यान अभिनेत्याच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे तो चर्चेत आला आहे. यापूर्वीही विनायकन याने वादग्रस्त वक्तव्य केले आहे. विशेष म्हणजे २०१९ मध्ये त्याला या कारणांमुळे अटकही झाली होती. दलित कार्यकर्त्या आणि माजी मॉडेल मृदुला देवी यांनी विनायकन यांना कार्यक्रमात आमंत्रित करण्यासाठी बोलावले होते. तेव्हा अश्लील आणि अपशब्द वापरल्याचा आरोप मृदुला देवी यांनी केला होता.