त्या दिवशी मी भाजपमध्ये प्रवेश करणार – गुलाम नबी आझाद

0 14
नवी मुंबई –  काँग्रेसचे ज्येष्ठ नेते  आणि  नुकतेच राज्यसभेतून निवृत्त झालेले खासदार गुलाम नबी आझाद  यांना निरोप देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या भाषणात भावुक झाले होते. पंतप्रधान नरेंद मोदी यांनी आपल्या भाषणात  गुलाम नबी आझाद   हे आपले चांगले मित्र आहे असे सांगत त्यांनी केलेल्या कामाबद्दल त्यांची जोरदार प्रशंसा केली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुलाम नबी आझाद यांची जोरदार प्रशंसा केल्यानं ते आता लवकरच काँग्रेस सोडून भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार अशी चर्चा सुरु झाली होती.  देशातली एका मोठ्या वर्तमान पत्राला आपली मुलाखत देताना याबाबत गुलाम नबी आझाद यांनी आपली प्रतिकिया देत आपण कोणत्या दिवशी भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहे याबद्दल भाष्य केला आहे.

राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिल्यानंतर उदयनराजे शरद पवारांच्या भेटीला

Related Posts
1 of 1,332

त्या मुलाखतीत गुलाम नबी आझाद यांनी सांगितले कि  ज्या दिवशी काश्मीरमध्ये काळा बर्फ पडेल त्या दिवशी मी भाजपात प्रवेश करेन असं स्पष्ट केलं. भाजपच काय मी त्या दिवशी कोणत्याही दुसऱ्या पक्षात प्रवेश करेन असं गुलाम नबी आझाद यांनी यावेळी सांगितलं. या प्रकारचे आरोप करणारी मंडळी मला ओळखत नाहीत, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

अहमदनगर जिल्हा बँकेच्या इतिहासात प्रथमच 17 जागा बिनविरोध

तर या मुलाखती मध्ये आपली आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आठवण  ताजा करताना त्यांनी सांगितले कि  नरेंद्र मोदी आणि आपली १९९० च्या दशकापासून ओळख आहे. त्यावेळी आम्ही दोघंही सरचिटणीस होतो आणि टीव्ही शो मध्ये एकमेकांच्या विरुद्ध वादविवाद करत असू. आम्ही कार्यक्रमाच्या दरम्यान एकमेकांशी जोरदार वाद केले. मात्र ज्या दिवशी आम्ही लवकर स्टुडिओमध्ये यायचो त्या दिवशी एकत्र चहा देखील घेतला आहे. सरचिटणीस नंतर आम्ही एकमेकांना मुख्यमंत्री म्हणून ओळखू लागलो. काही दिवसांनी मी आरोग्य मंत्री झालो. त्यावेळी देखील मोदींची वेगवेगळ्या बैठकांमध्ये भेट होत असे. आम्ही दर १०-१५ दिवसांनी एकमेकांशी चर्चा केलेली आहे. आमचं नातं हे खूप जुनं आहे अशी आठवण गुलाम नबी आझाद यांनी यावेळी सांगितली.

भिंगार खून प्रकरण नूरला ताब्यात घेताच गुटका लॉबी सक्रिय

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: