DNA मराठी

हल्ल्याशी माझा कुठलाही संबंध नाही; ‘त्या’ प्रकरणात मनोहर पोटे यांचे स्पष्टीकरण

0 327
I have nothing to do with the attack; Manohar Pote's explanation in 'that' case
प्रतिनिधी DNA मराठी टीम 
 
Related Posts
1 of 2,487
श्रीगोंदा – सतीश बोरुडे यांच्यावर झालेल्या हल्ल्याशी माझा कोणताही संबंध नाही,मला बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे,माझ्यावर आरोप करणाऱ्यांनी कायदेशीर मार्गाचा अवलंब करावा जर मी दोषी असेल तर मी हवी ती शिक्षा भोगायला तयार आहे गाव बंद ठेवून गावाला वेठीस धरू नये असे मत नगरसेवक मनोहर पोटे (Manohar Pote) यांनी व्यक्त केले.  सतीश बोरुडे यांच्यावरील हल्ला प्रकरनावरून झालेल्या आरोपांचे खंडन करण्यासाठी आज नगरपरिषद सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत पोटे बोलत होते
बोरुडे यांच्यावरील हल्ल्यामागे मनोहर पोटे हेच सूत्रधार असल्याचा आरोप काल टिळक भोस यांनी केला होता त्याला प्रत्युत्तर देताना पोटे यांनी भोस यांचा चांगलाच समाचार घेतला दारू विकून स्वतःचे प्रपंच चालवणाऱ्या टिळक भोस यांनी बाहेरून येऊन इथं आमच्यावर टीका करू नये मला शहरातील जनतेने निवडून दिलय त्यामुळे माझ्या बाबत काय निर्णय घ्यायचाय तो जनता घेईल भोस यांना फिरायला चारचाकी गाडी,डिझेल कुठून येत हा पैसा त्यांच्याकडे कुठून आला असा सवाल पोटे यांनी उपस्थित केला नगरपालिकेच्या विरोधात इथून मागे पण अर्ज येत होते पण याआधी अशी घटना घडली नाही बोरुडे यांना मारत असताना माझं नाव कुठंही घेतलेलं नाही जर कुणी म्हणलं माझं नाव घेतलं तर मी म्हणेल ती शिक्षा भोगायला तयार असल्याचे पोटे यांनी सांगितले

आपण नातेवाईक या नात्याने भोस यांना म्यासेज केले होते त्याचा त्यांनी विपर्यास केल्याचे पोटे यांनी सांगितले तसेच मी कधीच कोणत्याबाबतीत जातीयवाद करत नसल्याचे पोटे यांनी स्पष्ट केले तसेच बोरुडे यांच्या अर्ज करण्याला विरोध नाही त्यांना जी माहिती पाहिजे ती दिली जाते त्यांना कधीही चुकीची वागणूक मी दिली नाही पण त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीमुळे नगरपरिषदेचे अधिकारी,कर्मचारी वैतागून राजीनामा देण्याच्या तर काही बदली करण्याच्या तयारीत आहेत विनाकारण विकास कामात अडथळा आणणे चुकीचे असल्याचे पोटे यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेसाठी नगराध्यक्षा शुभांगी ताई पोटे, नगरसेवक अशोक खेंडके,बापूशेठ गोरे,उपनगराध्यक्ष संग्राम घोडके,रमेश लाढाणे,गणेश भोस,सतीश मखरे,प्रशांत गोरे,संतोष कोथिंबीरे,अंबादास औटी,राजाभाऊ लोखंडे, शहाजी खेतमाळीस,सुनील वाळके उपस्थित होते

यावेळी बोलताना नगरसेवक अशोक खेंडके यांनी आम्हाला जनतेने निवडून दिलय त्यामुळे आमच्याबाबत बोलताना टीका करणारयांनी चांगली वापरावी,आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होतात पण इथं आम्ही कुणीही नगरसेवक पैसे कमवायला आलेलो नाही असे त्यांनी सांगितले तसेच जिओ। नेटवर्कच्या प्रॉब्लेम मुळे वर्क ऑर्डर नसताना काम सुरू झाले ही थोडीशी गडबड झाली पण त्या कामाच टेंडर झालेलं आहे त्यामुळे त्यात चुकीचं काही नाही असे बापूशेठ गोरे यांनी सांगितले तसेच बोरुडे यांच्याविरोधात खोटा गुन्हा दाखल झाला ते चुकीचेच आहे पण अर्ज देणाऱ्यांनी जरूर अर्ज द्यावेत जिथं चुकीचं काम सुरू असेल तिथे विरोधक म्हणून आम्हाला बोलवावं पण विनाकारण अधिकारी कर्मचार्यांकडे येऊन बसायचं त्यांना वेठीस धरायच हे चुकीचं असल्याचे गोरे यांनी सांगितले.

प्रत्येक यात्रेला पाळण्याच्या दरावरून वाद घालणारे यावेळी गप्प का?

दरवर्षी नगरपालिका पाळणेवाल्यांशी करार करून यात्रा भरवते तेव्हा हेच टिळक भोस व त्यांचे सहकारी पाळण्याचे दर कमी करन्यावरून वाद घालतात पण यावर्षी ज्यांनी खासगी जागेत पाळणे आणून लोकांकडून शंभर रुपये एवढ्या मोठ्या दराने लोकांकडून तिकीट घेतले त्यांच्याविरोधात यांनी आवाज का उठवला नाही असा सवाल पोटे यांनी उपस्थित केला

 आमची कामे होतात,निधी मिळतो म्हणून आम्ही एकत्र

आज या पत्रकार परिषदेसाठी सत्ताधारी व विरोधी पक्षाचे नगरसेवक उपस्थित होते यावेळी नगरपरिषदेत सत्ताधारी व विरोधक एकत्र आहेत त्यामुळे नगरपरिषदेच्या कारभारावर अंकुश ठेवण्यासाठी विरोधकच राहिलेला नाही अशी टीका होत असल्याबाबत पत्रकारांनी प्रश्न उपस्थित केला असता आमची कामे होतात आम्हाला विकास कामासाठी निधी मिळतो त्यामुळे आम्ही शहराच्या विकासाच्या मुद्द्यावर एकत्र असल्याचे नगरसेवकांनी सांगित जिथे चुकीचे काही असेल तिथे आम्ही विरोध करतो असे स्पष्ट केले.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: