मी नारायण राणेंचं शैलीचं समर्थन करत नाही , मात्र …., चंद्रकांत पाटील म्हणाले

0 355
 नवी मुंबई –  केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असताना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याबाबत आक्षेपार्ह  वक्तव्यामुळे संपूर्ण राज्यात राजकीय वातावरण तापले असून राज्यात  शिवसैनिक नारायण राणे यांच्याविरोधात गुन्हे  दाखल करत आहे. तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षाचे काही नेत्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची पाठराखण असून भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनीही नारायण राणे यांना पाठिंबा देत एका प्रसारमाध्यमशी बोलताना आपली प्रतिक्रिया दिली आहे.  (I do not support Narayan Rane’s style, but ”.”, Said Chandrakant Patil)

चंद्रकांत पाटील म्हणाले, प्रत्येकाची वेगळी शैली असते. नारायण राणेंची ही आहे. मी त्या शैलीचं समर्थन करत नाही. पण त्यासाठी थेट अटक? अटक करणं कितपत योग्य आहे? तेही एका केंद्रीय मंत्र्यांना? सरकारने, प्रशासनाने नारायण राणे यांना समज द्यायला हवी होती. मात्र थेट अटक करणं योग्य नाही.

मोठी बातमी ! नारायण राणेंना अटक होणार? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

उद्धव ठाकरेंच्या तसंच शिवसेना नेत्यांच्या शैलीवरही चंद्रकांत पाटलांनी टीका केली आहे. ते म्हणाले, उद्धव ठाकरेंची दसरा मेळाव्याची भाषणं काढून पाहा. त्यातही त्यांनी वादग्रस्त विधानं केली आहेत. नीलम गोऱ्हे सभापती असून त्या राजकीय वक्तव्यं करतात. त्यांना विचारा, की तुम्ही सभापतीपदाचा राजीनामा दिला आहे का?

राणेंच्या वतीने पक्ष दिलगिरी व्यक्त करणार का या मुद्द्यावर बोलताना पाटील म्हणाले, दिलगिरीचा मुद्दा येत नाही. नारायण राणे हे नारळासारखे आहेत. वरून कठोर असले तरी ते आतून मऊ मनाचे आहेत. त्यांना वाटलं तर ते बोलतील. पण त्यांच्या एका वक्तव्यावरुन थेट अटक? आम्ही काही आडमुठे नाही. आम्हाला तेवढं महत्त्वाचं वाटलं तर विचार करु. पण राणेंच्या अटकेनंतर महाराष्ट्रात त्याचे काय परिणाम होतील याचा विचार सरकारने केला आहे का? राज्यातल्या कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी सरकारची आहे. त्याबद्दल त्यांनी विचार केला आहे का?(I do not support Narayan Rane’s style, but ”.”, Said Chandrakant Patil)

हे पण पहा – महिला तहसीलदार ज्योती देवरे यांची ऑडियो सुसाईड नोट व्हायरल-(Tehsildar Jyoti Deore)

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: