“मीच काँग्रेसची अध्यक्षा आहे”, पक्षाच्या नेत्यांना सोनिया गांधींचे उत्तर

0 235

नवी दिल्ली –    पंजाब (Punjab)  , राजस्थान (Rajasthan) आणि छत्तीसगड (Chhattisgarh) या काँग्रेस शासित राज्यात सुरु असलेल्या काँग्रेस पक्षामधील गोंधळादरम्यान आज शनिवार दि. १६ ऑक्टोबर रोजी  सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस कार्यकारिणीची (CWC) बैठक पार पडली. या बैठकीला काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यासह पक्षातील इतर नेते उपस्थित होते. यावेळी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आपणच काँग्रेस पक्षाचे स्थायी अध्यक्ष असल्याचे म्हणत विरोधकांना उत्तर दिले आहे. ( I am the President of the Congress “, Sonia Gandhi’s reply to the party leaders)

पुढील वर्षात येणाऱ्या पाच राज्यातील विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन आयोजित केलेल्या या बैठकीत सोनिया गांधींनी भाषणाच्या सुरुवातीलाच काँग्रेसच्या प्रत्येक सदस्याला पक्षाचे पुनरुज्जीवन हवे आहे पण या ऐक्यासाठी आणि पक्षाचे हित असणे आवश्यक आहे असे म्हटले.

जी -२३’ नेत्यांच्या समोरच सोनिया गांधी यांनी मी पूर्णवेळ आणि व्यावहारिक काँग्रेस अध्यक्ष आहे असे म्हटले. मी नेहमीच स्पष्टतेचे कौतुक केले आहे, माध्यमांद्वारे माझ्याशी बोलण्याची गरज नाही. आपण सर्वांनी प्रामाणिक चर्चा करूया,” असे सोनिया गांधी म्हणाल्या. तसेच संघटनात्मक निवडणुका आणि अध्यक्षांच्या निवडीबाबत सोनिया गांधी यांनी भाष्य केले आहे. आम्ही ३० जूनपर्यंत काँग्रेसच्या नियमित अध्यक्षांच्या निवडीचा रोडमॅप अंतिम केला होता, पण करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे मुदत अनिश्चित काळासाठी वाढवण्यात आली. आज स्पष्टता आणण्याची संधी आहे,असे सोनिया गांधी म्हणाल्या.

मॉर्निंग वॉक करणाऱ्या महिलेचं मंगळसूत्र लंपास.., गुन्हा दाखल

Related Posts
1 of 1,494

आगामी विधानसभा निवडणुकांविषयी बोलताना काँग्रेस अध्यक्ष्या सोनिया गांधी म्हणाल्या, आम्हाला अनेक आव्हानांना सामोरे जावे लागेल, पण जर आपण एकजूट आणि शिस्तबद्ध राहिलो आणि केवळ पक्षाच्या हितावर लक्ष केंद्रित केले तर मला खात्री आहे की आम्ही चांगले काम करू. उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाल्याची माहितीही सोनिया गांधी यांनी दिली.

यावेळी सोनिया गांधी यांनी लखीमपूर खेरीच्या घटनेवरही भाष्य केले. अलीकडे लखीमपूर-खेरीसारख्या धक्कादायक घटना भाजपाची मानसिकता दर्शवतात. यातून ते शेतकऱ्यांच्या आंदोलनाकडे कसे पाहत आहेत ते स्पष्ट दिसते. यातून स्पष्ट दिसते की भाजपा शेतकऱ्यांच्या जीवनाच्या आणि त्यांच्या उपजीविकेच्या संरक्षणासाठी या स्थिर संघर्षाला कसे सामोरे जात आहे.(I am the President of the Congress “, Sonia Gandhi’s reply to the party leaders)

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: