
श्रीगोंदा :- श्रीगोंदा तालुक्यात दोन पोलीस ठाणे आहेत हे दोन्हीं पोलीस ठाणे कायम चर्चेत राहिली आहेत त्यातच बेलवंडी पोलीस ठाण्यात एका पोलीस हेडकॉन्स्टेबल ने बेलवंडी पोलीस ठाण्याच्या व्हाट्सएपच्या ग्रुप वर आत्महत्या करत असल्याची पोस्ट टाकली परंतु तेव्हापासून तो पोलीस कर्मचारी गायब असल्याने वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले आहे.
श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नंदकुमार धुमाळ यांच्याकडून त्याच पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या पोलीस हेडकॉन्स्टेबल आजीनाथ खेडकर याना कायम वेगळ्या दर्जाची वागणूक देत असल्याबाबत चर्चा ऐकण्यास मिळत असे मात्र दोन दिवसापुर्वी पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ आणि पोलीस हेडकॉन्स्टेबल आजीनाथ खेडकर यांच्यात शाब्दिक चकमक झाली होती त्यावेळी पोलीस निरीक्षक दुधाळ यांनी खेडकर याना मोठ्या प्रमाणात दमबाजी केल्याची घटना घडली आहे त्यावरून पोलीस निरीक्षक दुधाळ यांनी त्यांना संगीतले की पोलीस अधीक्षक साहेब यांच्याजवळ माझे मोठ्या प्रमाणात वजन आहे मी ते वापरून तुझी नोकरीच घालवतो असे बोलले असल्याचे एका कर्मचाऱ्याने सांगितले आहे .
या सर्व घटनेचा आजीनाथ खेडकर यांना मनात राग घरून त्यांनी बेलवंडी पोलीस ठाण्याच्या व्हाट्सएपच्या ग्रुप वर मी पोलीस निरीक्षक यांचेकडून मला सारखा त्रास दिला जात असून पोलीस अधीक्षक हे माझ्या चांगल्या परिचयाचे आहेत त्यांना सांगून मी तुला निलंबित करेल म्हणून पोलीस निरीक्षक यांच्या जाचाला कंटाळून मी आत्महत्या करत आहे अशी पोस्ट टाकून पोलिस हेडकॉन्स्टेबल आजीनाथ खेडकर हे दोन दिवसांपासून गायब झाले आहेत त्यामुळे परिसरात वेगवेगळ्या चर्चेलउधाण आले होते.