हैदराबाद पोलिसांनी थेट सुपरस्टार अल्लू अर्जुनवरच केली कारवाई; जाणुन घ्या प्रकरण

0 202
Hyderabad police take action against superstar Allu Arjun; Know the case

प्रतिनिधी DNA मराठी टीम  

मुंबई  –   अभिनेता अल्लू अर्जुन(Allu Arjun) ‘पुष्पा : द राइज’ या  चित्रपटामुळे संपूर्ण भारतात फेमस (Famous)झाला आहे. तो नेहमी काहींना काही कारणाने सोशल मीडियावर (Social Media) चर्चेत असतो. पुन्हा एकदा तो आता एक वेगळ्याच कारणाने सोशल मीडियावर चर्चेत आले आहे. त्याने वाहतुकीचे काही नियम मोडल्याने तो चर्चेत आला आहे. वाहतुकीचे नियम मोडल्यामुळे त्याला हैदराबाद पोलिसांनी (Hyderabad police)पकडले आहे.
 समोर आलेल्या माहितीनुसार अल्लू अर्जुनने वाहतुकीचे नियम मोडले. ज्यामुळे त्याला दंडही भरावा लागला . हैदराबाद पोलिसांनी अल्लू अर्जुनच्या लग्झरी कार लँड रेंज रोवरचं चालान कापून त्याच्याकडून 700 रुपयांचा दंड देखील वसूल केला. मिळालेल्या माहितीनुसार काळ्या रंगाच्या काचा असलेल्या कारमधील अल्लू अर्जुनला पोलीसांनी हैदराबादच्या बीजी सेंटरजवळ थांबवलं. कारण भारतात अशा प्रकारच्या काचा वापरण्यावर बंदी आहे. मात्र असं असतानाही भारतात अनेक सेलिब्रेटी अशाप्रकारच्या कारचा वापर करतात. पण पोलीस देखील त्यांचं काम चोख पार पाडताना दिसत आहेत.
Related Posts
1 of 2,397

दरम्यान याआधी तेलुगू दिग्दर्शक Trivikram Srinivas, कल्याण राम, जूनियर एनटीआर आणि Manchu Mano यांनाही अशाप्रकारे कारला काळ्या रंगाच्या काचा वापरल्यानं हैदराबाद ट्राफिक पोलीसांनी रस्त्यात थांबवून त्यांच्याकडून दंड वसूल केला आहे.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: