अनैतिक संबंधामध्ये काटा ठरणाऱ्या पतीला पत्नीच्या प्रियकराने केली निर्घृण हत्या अन् ..

0 331
Husband who was a thorn in the side of immoral relationship was brutally murdered by his wife's lover.
सातारा – ३ मे मंगळवारी रात्री सातारामधील फरासवाडी (कोंडवे) परिसरात एकाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी या प्रकरणात अवघ्या १२ तासांतच आरोपीला अटक केली आहे. हा खून अनैतिक संबंधांमुळे ( immoral relationship) झाल्याची माहिती समोर आली आहे. मृताच्या पत्नीसोबत आरोपीचे अनैतिक संबंध होते मात्र मयत व्यक्ती या संबंधामध्ये आडकाठी करीत असल्याने आरोपीने हा खून केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे.
 फिरोज चाँद मुलाणी (वय 37, रा. फरासवाडी, मूळ राहणार कडेगाव, जि. सांगली) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून, शकील निजाम फरास (वय 42, रा. नेले, ता. सातारा) असे आरोपीचे नाव आहे.
Related Posts
1 of 2,326

या प्रकरणात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी (दि. 3) रात्री 8.20 वाजण्यापूर्वी कोंडवे (ता. जि. सातारा) गावच्या हद्दीत फिरोज चाँद मुलाणी यांचा अज्ञाताकडून डोक्यात धारदार शस्त्र्ााने वार करून निर्घृण खून झाल्याचे उघडकीस आल्याने परिसर हादरला. या खुनाबाबत मृताचा भाऊ अस्लम चाँद मुलाणी यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला. जिल्हा पोलीसप्रमुख अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक अजित बोऱहाडे व सहायक पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी गुह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन हा गुन्हा उघडकीस आणण्याची सूचना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ व सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांना दिली. त्यांनी सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे यांच्या अधिपत्याखाली एक तपास पथक तयार केले.

 

 

स्थानिक गुन्हे शाखेकडील तपास पथकाने व सातारा तालुका पोलीस ठाण्याकडील अधिकारी व अंमलदार यांनी घटनास्थळी भेट देऊtन पाहणी केली. घटनास्थळावरील व आजूबाजूच्या परिसरामध्ये तपास पथकाने सखोल विचारपूस केली असता, शकीलने फिरोजचा खून केल्याचे समजले. तपास पथकाने शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले. त्याने माझे व मृताच्या पत्नीचे अनैतिक संबंध होते. त्यामध्ये तो आडकाठी करीत असल्याने त्याचा खून केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: