चारित्र्याच्या संशयातून पतीने केली पत्नीची हत्या , आरोपीला अटक

0 315

पिंपरी चिंचवड –  आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिची धारधार कोयत्याने वार करून पतीनेच हत्या केल्याची धक्कादायक घटना पिंपरी चिंचवड मधील पुनावळे भागात काल रात्री दि. १७ ऑगस्ट रोजी घडली आहे. या प्रकरणात हिंजवडी पोलिसांनी आरोपी पतीविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार आरोपी राहुल प्रतापे हा सुरक्षारक्षक म्हणून काम करत होता तो पत्नी गौरीच्या चारित्र्यावर सतत संशय घेत असल्याने त्या दोघांमध्ये वारंवार वाद हि होत होते. मंगळवारी रात्री ही चारित्र्याच्या संशयावरुन राहुलने गौरी हिच्याशी भांडण केले. त्यानंतर चिडून तिच्यावर कोयत्याने वार केल्याचा आरोप आहे. या वारमुळे गौरी  गंभीर जखमी झाल्याने तिचा मृत्यू झाला.

आरोपी राहुल प्रतापे हा गेल्या दोन वर्षांपासून विजयनगर माळवाडी पुनावळे भागात आपल्या वडील, भाऊ, पत्नी यांच्यासह भाड्याच्या घरात राहतो. पती-पत्नीमध्ये वारंवार भांडणं होत असल्याने घरमालकाने त्यांना जागा सोडून जाण्यासही सांगितला होता.  जून 2021 मध्ये गौरी पती राहुलला सोडून माहेरी राहण्यास गेली होती. मात्र जुलैच्या शेवटच्या आठवड्यात राहुल पत्नीला पुन्हा सासरी घेऊन आला. परंतु त्यानंतर ही दोघांमध्ये चारित्र्याच्या संशयातून वाद सुरुच होते.

हे पण पहा –  मी नव्हे  तो पुन्हा येईल… ‘या’ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता. 

Related Posts
1 of 1,481

मंगळवारी रात्री 9.15 वाजताच्या सुमारास घरमालकाने आपल्या फ्लॅटच्या गॅलरीतून पाहिलं असता राहुल आणि गौरी यांच्यात भांडण सुरु असल्याचं त्यांना दिसलं. यावेळी राहुल घराच्या पाठीमागे असलेल्या कच्च्या रस्त्यावर लोखंडी कोयत्याने गौरीला मारताना दिसला. त्यामुळे राहुलचा भाऊ संतोष आणि घरमालक गौरीला वाचवण्यासाठी धावत गेले. तेव्हा त्यांना पाहून राहुल लोखंडी कोयत्यासह पळून गेला.

“तो” व्हिडिओ तत्काळ डिलीट करण्याचा फेसबुक ने दिली राहुल गांधींना सूचना

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: