शुल्लक कारणावरून पतीने केला पत्नीचा खून, आरोपीला अटक

0 274

राहुरी-  कामानिमित्त परगावी असलेल्या मुलाला भेटायला जाण्यावरून झालेल्या वादातून पतीने पत्नीच्या डोक्यात दगड आणि तीक्ष्ण हत्याराने वार करत खून केला.  ही घटना राहुरी तालुक्यातील गुंजाळे  येथे घडली. गुरुवारी   दि.१२ रोजी ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी मयत महिलेची मुलगी बाली बाळू निकम (वय २२) हिने वांबोरी दूरक्षेत्रात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी आरोपीस अटक केली आहेत. (Husband kills wife for charges, arrests accused)

मयत अलका वसंत शिंदे (वय ४५) हिने पती वसंत लक्ष्मण शिंदे (रा. गुंजाळे, ता. राहुरी) याच्याकडे मुलाला भेटण्यासाठी बांगर्डे (ता.श्रीगोंदा) येथे जाण्याचा आग्रह धरला. परंतु वसंत याने अलका हीस मुलाकडे जाण्यास विरोध केला.  त्यामुळे दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. त्यात रागाच्या भरात अलका गुरुवारी हिच्या डोक्यावर व छातीवर धारदार  हत्याराने वार केले. त्यामध्ये अलका पथक हिचा जागेवरच मृत्यू झाला.

तहसीलदार ज्योती देवरे यांच्या आँडिओ क्लिपमुळे खळबळ , दिला आत्महत्याचा इशारा

Related Posts
1 of 1,481
गुरुवारी सकाळी ७ वाजता वसंत मुलीकडे गेला. तुझी आई झोपलेली आहे . तिला जाऊन बघ, असे त्याने म्हटले मुलीला सांगितले व तो तेथून पळून  गेला. त्यानंतर मुलगी बाली हिने तात्काळ वांबोरी पोलीस दूरक्षेत्राशी संघर्ष संपर्क करून घटनेची माहिती दिली.  श्रीरामपूरचे विभागीय उपाधीक्षक  संदीप मिटके,राहुरीचे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ, पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव, पोलीस उपनिरीक्षक शंकरसिंग राजपूत, पोलीस हेडकॉन्स्टेबल रवींद्र डावखर, वांबोरीचे पोलीस हवलदार चंद्रकांत बराटे पोलीस हेडकॉन्स्टेबल संतोष राठोड, पोलीस कॉन्स्टेबल रमेश शिंदे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. लपून बसलेला आरोपीचा स्थानिक गावकऱ्यांच्या मदतीने शोध घेऊन ताब्यात घेतले त्यानंतर गुन्ह्याचा उलगडा झाला.  (Husband kills wife for charges, arrests accused)

हे पण पहा – नगर पोलिसांची राज्यात प्रथम ई-टपाल(E-TAPAL)कार्यप्रणाली सुरु

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: