पती -पत्नीला लाथाबुक्क्यांनी मारहाण , चार जणांवर गुन्हा दाखल

0 220

अहमदनगर  –  जिल्हयातील राहुरी तालुक्यातील तिळापूर येथे आरोपी सामाईक बांध कोरत होते. यावेळी बांध कोरण्यास मनाई करणाऱ्या लोकांना कुऱ्हाड, खुरपे व काठीने मारहाण करून जखमी केल्याची घटना दि. १९ सप्टेंबर रोजी घडली.

बाळासाहेब एकनाथ आचपळे (वय ४०, रा. तिळापूर ता. राहुरी) यांनी राहरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले, दि. १९ सप्टेंबर रोजी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास तिळापूर येथील जोगेश्वर मंदिराजवळ या घटनेतील आरोपी बाळासाहेब आचपळे यांचा सामायिक बांध कोरत होते. तेव्हा बाळासाहेब आचपळे, त्यांची पत्नी व मुलगा हे तेथे गेले व त्यांना म्हणाले, आपण सरकारी मोजणी आणून मोजणी करून घेऊ. तुम्ही आता आपला सामायिक बांध कोरू नका. याचा त्यांना राग आल्याने आरोपींनी आचपळे, त्यांची पत्नी रेखा व मुलगा प्रवीण यांना कुऱ्हाड, खुरपे व काठीने मारहाण करुन जखमी केले. तसेच शिवीगाळ दमदाटी करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

गोदावरी तटावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा , ३२६९२ क्यूसेक पाण्याचा विसर्ग

Related Posts
1 of 1,481

आचपळे यांच्या फिर्यादीवरून जगन्नाथ एकनाथ आचपळे, संगीता जगन्नाथ आचपळे, बबलू जगन्नाथ आचपळे, भारती बबलू फळे सर्व रा. तिळापूर ता. राहुरी या चारजणांवर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे पण पहा – रेखा जरे हत्याकांड प्रकरणातील आरोपी पत्रकार बाळ बोठेचा जामीन अर्ज नामंजूर

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: