
पुणे मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयात कार्यकर्ते भिडल्यानंतर एकच गोंधळ निर्माण झाला. सभेबाबतची बैठक होती. यावेळी शिवाजीनगरचे विभाग अध्यक्ष आणि मनसैनिकामध्ये झटापट पाहायला मिळाली. शिवाजीनगरचे विभाग अध्यक्ष रणजित शिरोळे आणि विद्यार्थी सेनेचे शैलेश विटकर यांचा मनसे कार्यालयात राडा झाला. रणजित शिरोळे विभाग अध्यक्ष असून कुठल्याच बैठकांना का बोलावत नाही, याचा जाब विटकर यांनी बैठकीत विचारल्यावर शिरोळे धावून गेले. त्यानंतर दोघांमध्ये झटापट झाली.
पुणे शहराध्यक्ष आणि मनसेच्या सर्व नेत्यासमोर हा वाद उफाळून आला. अयोध्ये दौऱ्यासंबंधी नावनोंदणी आणि सभेच्या नियोजनाच्या बैठकी दरम्यान हे भांडण झाल्याने मनसेत आलबेल चालल्याचे दिसून आले आहे.