फेसबुक पोस्टवरून दोन गटात तुफान राडा, दगडफेक, चार पोलीस जखमी

0 306

उस्मानाबाद – सोशल मीडिया अँप (Social Media App) चा गैरवापर करत दोन समाजात धार्मिक वाद निर्माण  करण्याची घटना काही दिवसांपूर्वी  देशासह राज्यात घडली आहे. मात्र परत एकदा अशीच एक घटना राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यात (Osmanabad district)  घडली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या मुघल राजा औरंगजेबाविषयीच्या (Mughal King Aurangzeb) पोस्टवरून दोन गटात( two groups)  तुफान दगडफेक झाली आहे . याघटने नंतर परिसरात भीतीचा वातावरण निर्माण झाला आहे. (Hurricane Rada, stone-throwing, four policemen injured in two groups from Facebook post)

ही घटना मंगळवारी दि. १९ ऑक्टोबर रात्री १० च्या सुमारास उस्मानाबाद शहरातील विजय चौक येथे घडली. या दगडफेकीत विजय चौक येथे पोलीस बंदोबस्तासाठी असलेले ४ पोलीस जखमी झाले आहेत. त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत . घटनेची माहिती मिळताच पोलीस उपविभागीय अधिकारी अंजुम शेख, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक गजानन घाडगे, शहर पोलीस निरिक्षक सुरेश बुधवंत , तहसिलदार गणेश माळी यांनी तातडीने कारवाई केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुघल राजा औरंगजेबाविषयीच्या आक्षेपार्ह पोस्टनंतर हा वाद उफाळला.प्रशासनाने बंदोबस्त लावत परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. पोलीस प्रशासन दोन्ही गटातील कायदा हातात घेणाऱ्यांवर कार्यवाही करत आहे. जनतेने अफवांवर विश्वास न ठेवता पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन शहर पोलीस निरीक्षक सुरेश बुधवंत यांनी केले आहे.

अजितदादा परवानगी द्या, सोमय्याला बघून घेतो, शशिकांत शिंदे आक्रमक

Related Posts
1 of 1,603

शहर पोलीस निरीक्षक सुरेश बुधवंत म्हणाले, ही घटना फार विशेष नव्हती दोन तरुणांनी फेसबूकवर एक प्रतिक्रिया दिली होती. दुसऱ्या गटाने या प्रतिक्रियेमुळे आमच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप केला. या फेसबुक प्रतिक्रियेवरून तक्रार आल्यानंतर आम्ही त्यावर कारवाई करणार आहे. मात्र, पोलीस कायदेशीर कारवाई करत असताना शांत राहणं गरजेचं होतं. विनाकारण चौकात येऊन हुल्लडबाजी करून, दगडफेक करून कायदा हातात घेतला आहे.

मी विजय चौकातील दोन्ही गटातील नागरिकांना आवाहन करतो की अफवांवर विश्वास ठेऊ नका. पोलीस पोलिसांचं काम करतील. ज्यांनी गुन्हा केलाय त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. फेसबुकवर आक्षेपार्ह प्रतिक्रिया देऊन वाद तयार करणारे आणि दगडफेक घेऊन कायदा हातात घेणाऱ्या दोन्हींवर कारवाई केली जाईल. नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावं. ज्यांना या घटनेविषयी माहिती असेल त्यांनी आम्हाला गुप्तपणे ही माहिती द्यावी. या माहितीचं आम्ही स्वागत करू, असं आवाहन पोलीस निरीक्षक सुरेश बुधवंत यांनी केलं.(Hurricane Rada, stone-throwing, four policemen injured in two groups from Facebook post)

 हे पण पहा  – Eid E Milad un Nabi Ahmednagar 2021

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: