.. तरीही महाविकास आघाडीचे चारही उमेदवार निवडून येतील – जयंत पाटील

0 169
.. However, all the four candidates of Mahavikas Aghadi will be elected - Jayant Patil

 

मुंबई –  भाजपने (BJP) कितीही दावे केले तरी आमची बेरीज बघितली तर महाविकास आघाडीचे (MVA) चारही उमेदवार निवडून येतील, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.

 

आज राज्यसभेसाठी मतदान होत असून विधानभवनात जात असताना जयंत पाटील यांनी माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिले. आम्ही तिन्हीही पक्ष एकत्र लढत आहोत. नाराजी कुणाची नाही. सर्व संपर्कात आहेत. नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांनी अपिल केले आहे. याचिकेचा निर्णय त्यांच्या बाजूने व्हावा अशी अपेक्षा आहे, असेही जयंत पाटील म्हणाले.

 

 

Related Posts
1 of 2,139

शिवसेनेसह भारतीय जनता पक्षाने राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी उमेदवार दिल्याने राज्यातील राजकारण चांगलाच तापला असून यावेळी राज्यसभेच्या निवडणुकीला एक वेगळेच महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे सध्या संपूर्ण राज्याचा लक्ष या निवडणुकीकडे लागला आहे.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: