ट्रक आणि क्रुझरचा भीषण अपघात; 7 जणांचा जागीच मृत्यू

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, महामार्गावर ट्रक आणि क्रुझर यांची समोरासमोर जोरदार धडक झाली. ही धडक इतकी जोरदार होती की, क्रुझर गाडीचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे. मृतक हे सर्व लातूर जिल्ह्यातील आर्वी येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. हे सर्व जण आज सकाळी नातेवाईकांकडे कार्यक्रमाला जात असताना ट्रक आणि क्रुझरची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातामुळे महामार्गावर काही प्रमाणात वाहतूक कोंडी सुद्धा झाली.
नो बॉल वादानंतर पंत आणि शार्दुलच्या अडचणीत वाढ; IPL समितीने दिली 'ही' मोठी शिक्षा#IPL2022 #RishabhPant #DelhiCapitals #IPL https://t.co/Mgd6lmRJJv
— DNA (@dnamarathi) April 23, 2022
अद्याप मयताची नावे समोर आली नसून घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. या अपघातात जखमी झालेल्यांना अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.