DNA मराठी

पेट्रोल टँकर आणि ट्रकमध्ये भीषण अपघात; 6 जणांचा जागीच मृत्यू

0 183
Horrific accidents in petrol tankers and trucks; 6 died on the spot

 

चंद्रपूर  –   पेट्रोल वाहतूक करणारा टँकर आणि लाकूड नेणाऱ्या ट्रकमध्ये  समोरासमोर धडक होऊन चंद्रपूर शहराजवळ (Chandrapur)  मूल मार्गावरच्या अजयपूर गावाजवळ भीषण अपघात (accident) झाला आहे.  या भीषण अपघातानंतर लागलेल्या आगीमुळे सहा जणांचा जागीच मुत्यू झाला आहे.
Related Posts
1 of 2,448

आगीच्या उंच ज्वाळांनी लगतच्या जंगलातील झाडेही आगीच्या विळख्यात सापडली. या अपघाताची माहिती मिळताच मूल-चंद्रपूर येथून अग्निशमन पथके रवाना करण्यात आली. मूल-रामनगर पोलिसांची पथके, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले होते. या अपघातामध्ये रात्रभर वाहतूक जाम झाली होती.  या अपघातामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूस वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. दोनपैकी एका ट्रकमध्ये लाकूड असल्याची माहिती असून या आगीत चालक-वाहकांचे काय झाले याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही.

 

 

अपघातानंतर भीषण आग लागली. आग लागल्याने ट्रकचे टायर फुटल्याने आग आणखी भडकली. मूल-चंद्रपूर अग्निशमन पथकांनी आगीवर नियंत्रण मिळवलं. मात्र, या आगीत सहा जण होरपळले असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. मात्र मृतदेहांची ओळख अद्याप पटलेली नाही, पोलीस तपास सुरू आहे. तसेच मृतकांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: