पत्रकार चौकामध्ये भीषण अपघात; दोन तरुणाचा जागीच मृत्यू

अहमदनगर – शहरातील पत्रकार चौकात दुपारच्या सुमारास ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला असून या अपघातामध्ये दोन तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे.
या भीषण अपघातात मध्ये बाळकृष्ण टेलोरे व उद्धव टेलोरे (कोल्हार ता.पाथर्डी) असे मृतांची नावे आहेत. नगरच्या दिशेने येणाऱ्या मलाट्रकने दुचाकीला धडक दिल्याने हा अपघात झाला. या अपघाताची माहिती मिळताच तोफखाना शहर वाहतूक शाखा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी ट्रक चालकास ताब्यात घेतला असून पुढील तपास सुरू केला आहे.