गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी वृद्धेचे घर पाडून केले बेसहारा , चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

0
 श्रीगोंदा –   हिरडगाव ता. श्रीगोंदा येथे सरस्वती निवृत्ती दरेकर या ७५ वर्षीय वृद्धेचे गावातील काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी घर पाडून तिला बेघर केले आहे. अनेक वर्षांपासून वृद्धा त्या घरात राहत होती. तिने गयावया करूनही तिच्या विनंतीकडे दुर्लक्ष करत बळजबरीने घरात घुसून भिंती पाडत संपूर्ण घरच पाडून टाकले. याबाबत वृद्धेचे श्रीगोंदा पोलिस ठाण्यात चौघांविरोधात फिर्याद दाखल केली आहे.(Hooligans demolished the old man’s house and filed a case against the four)
 याबाबत सविस्तर माहिती अशी की हिरडगाव फाट्याच्या पुढे काही अंतरावर असलेल्या दरेकर वस्ती येथे सरस्वती निवृत्ती दरेकर या अनेक वर्षांपासून राहत होत्या. त्यांना दोन मुले असून त्या मुलांपासून विभक्त राहत होत्या. त्यांच्या घराशेजारी असणाऱ्या भावकीतील लोकांनी शेताची मोजणी झाल्यावर वृध्द सरस्वती यांना दि.१७ रोजी तुझे घर आमच्या हद्दीत येत आहे असे सांगून बाहेर निघण्यास सांगितले. सरस्वती दरेकर यांनी त्यांना विनंती केली की थोडे दिवस थांबा मी घर सोडून जाते .
परंतु तिच्या विनंतिकडे दुर्लक्ष करत गुंड प्रवृत्तीच्या भानुदास लक्ष्मण दरेकर, तुळशीराम लक्ष्मण दरेकर, किरण भानुदास दरेकर व लक्ष्मण भिकाजी दरेकर यांनी तिचे काहीही म्हणणे न ऐकता घरात घुसून भिंती पाडण्यास सुरुवात केली व घरातील वस्तू बाहेर फेकत संपूर्ण घर जमीनदोस्त केले.या सर्व प्रकारामुळे वृद्धेला रस्त्यावर आणुन वरील भावकीतील चौघा जणांनी वृद्धेवर मोठा अन्याय केला आहे. याप्रकरणी सरस्वती दरेकर यांनी भानुदास लक्ष्मण दरेकर, तुळशीराम लक्ष्मण दरेकर, किरण भानुदास दरेकर व लक्ष्मण भिकाजी दरेकर यांच्याविरोधात श्रीगोंदा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.(Hooligans demolished the old man’s house and filed a case against the four)
Related Posts
1 of 1,153
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: