DNA मराठी

हनीट्रॅपच्या गुन्ह्यातील ‘त्या’ आरोपीला अखेर अटक

0 244
Shocking! Air Force Trapped in Honeytrap; Major police action

 

अहमदनगर –  हनीट्रॅपच्या गुन्ह्यामध्ये गेल्या एक वर्षापासून पसार असलेल्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. सागर साहेबराव खरमाळे (वय ३५ रा. शिवाजीनगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. नगर तालुका पोलिसांनी ही कारवाई केली आहे. आरोपीकडून २० हजार रूपयांचे दोन मोबाईल जप्त करण्यात आले आहे.

 

आरोपी खरमाळेने एका महिलेसह त्याच्या इतर साथीदारांच्या मदतीने एका अधिकाऱ्यावर हनीट्रॅप करून फसवले होते. तसेच अधिकाऱ्याकडे वारंवार दोन कोटी रूपयांची मागणी करण्यात येत होती. नगर तालुका पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल आहे. आरोपी खरमाळे बोल्हेगाव परिसरात येणार असल्याची माहिती नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांना मिळाली होती. माहितीच्या आधारे नगर तालुका पोलिसांनी सापळा लावून आरोपी खरमाळेला अटक केली.

 

 

Related Posts
1 of 2,530

सहाय्यक पोलीस निरीक्षक सानप, पोलीस अंमलदार दिनकर घोरपडे, संतोष लगड, सचिन वणवे, राहुल शिंदे, जयश्री फुंदे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

 

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: