
प्रतिनिधी- DNA मराठी टीम
मुंबई – राज्यात मागच्या काही दिवसांपासून कायदा-सुव्यवस्थेबाबत मोठा प्रश्न चिन्ह उपस्थित झाला आहे. पुणे जिल्ह्यात देखील महिलांविरोधात होणाऱ्या गुन्ह्यामध्ये वाढ पहिला मिळत आहे. यातच आता पोलीस प्रशासनाकडून ‘क्राइम कॉन्फरन्स’चं आयोजन करण्यात आलं होते. या परिषदेला गृहमंत्री दिलीप वळसे-पाटलांसह ( Dilip Walse Patil) राज्यातील अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारीही उपस्थित होते.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या सभेत मशिदीवरील भोंग्यांबद्दल केलेल्या वक्तव्याने राजकीय वातावरण तापलं आहे. या पार्श्वभूमीवर धार्मिक तेढही निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याबद्दल बोलताना गृहमंत्री म्हणाले की, ‘दोन समाजामध्ये धार्मिक तेढ निर्माण होऊ नये, याची काळजी प्रत्येकाने घ्यायला हवी. पोलिसांनाही याबाबत अलर्ट राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत,’ असं वळसे पाटील म्हणाले.