पोलीस आयुक्तांनी घेतली गृहमंत्र्यांची भेट, वानखेडेंवर दाखल होणार गुन्हा ?

0 195
 नवी मुंबई –   ड्रग पार्टी (Drug party) प्रकरणात आता दररोज काहींना काही घडामोडी घडत आहे. ही कारवाई करताना पंच असलेल्या प्रभाकर साईलला (Prabhakar Sail ) याला पोलीस संरक्षण दिल्यानंतर  हालचालींना वेग आला आहे. मुंबई चे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे (Police Commissioner Hemant Nagarale) यांनी आज गृहमंत्री (Home Minister) दिलीप वळसे पाटील  ( Dilip Walse Patil) यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चाना उधाण आला आहे . याभेटी मध्ये गृहमंत्र्यांनी गुन्हा दाखल होण्याच्या प्रक्रियेबद्दल विचारणा केल्याची माहिती समोर आली आहे. (Home Minister meets Commissioner of Police, will a case be filed against Wankhede?) 
 मिळालेल्या माहितीनुसार गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी मंत्रालयात जाऊन भेट घेतली ही भेट प्रभाकर साहिल प्रकरणी झाली असल्याची पमाहिती प्राप्त झाली आहे. प्रभाकर साईलने केलेल्या आरोपानंतर पोलिसांनी त्याला संरक्षण दिले आहे. त्याने तक्रार दिली असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया कुठपर्यंत आलीये अशी विचारणा खुद्द गृहमंत्र्यांनी केली आहे. त्यामुळे आता या प्रकरणी NCB वर गुन्हा दाखल होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
Related Posts
1 of 1,603

प्रभाकर साईल याने NCB च्या एका बड्या अधिकाऱ्यावर आणि पंच केपी गोसावी यांच्यावर खंडणीचा आरोप केला आहे. प्रभाकर साईल हा स्वत:ला केपी गोसावीचा बॉडीगार्ड असल्याचं सांगत आहे.  किरण गोसावीनं शाहरुख खानकडे (Shah Rukh Khan) 25 कोटींची मागणी केली होती. त्यानंतर ही डील 18 कोटींवर झाली. यातील 8 कोटी हे एनसीबीच्या अधिकाऱ्याला द्यायचे असं ठरलं होतं. त्याच्या आरोपानंतर त्याने पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी त्याला संरक्षण दिले आहे. तर दुसरीकडे एनसीबी आणि समीर वानखेडे यांनी साईलचा दावा ग्राह्य धरू नये म्हणून कोर्टात धाव घेतली पण तिथेही याचिका फेटाळून लावली.याच दरम्यान, दिलीप वळसे पाटील यांनी जर प्रभाकर साईलने गुन्हा दाखल केला तर पोलिसांना कारवाई करावी लागेल, असं स्पष्ट केलं होतं. त्यानंतर आता मुंबईचे पोलीस आयुक्त वळसे पाटलांना भेटायला आहे.  (Home Minister meets Commissioner of Police, will a case be filed against Wankhede?) 

हे पण पहा – येसवडी गावातील अनाधिकृत हातभट्टी आणि दारु विक्रीवर कारवाई व्हावी

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: