घरफोडी , चोरी करणारे अट्टल चोरटे जेरबंद , श्रीगोंदा पोलीसांची कामगिरी

0 310
Home burglary, burglary arrested, Shrigonda police performance
 
श्रीगोंदा  :-  दि ८ मे  रोजी फिर्यादी सुभाष नारायण गायकवाड (वय 45 वर्षे रा.देउळगाव गलांडे ता.श्रीगोंदा)  यांनी फिर्याद दिली की.दि.७मे रोजी रात्री 9.00 वा.ते दि ८ मे  रोजी चे रात्री कोणीतरी अज्ञात चोरट्याने   घराचे उघडे दरवाज्यावाटे आत प्रवेश करुन फिर्यादीचे कपाटातील ठेवलेले सोन्याचे दागिने चोरुन नेले आहे.
त्याबाबत श्रीगोंदा पोलीस ( Shrigonda police) स्टेशनमध्ये भा.द.वि.क 380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता . सदर गुन्हयाचा तपास चालु असताना रामराव ढिकले पोलीस निरीक्षक श्रीगोंदा पोलीस स्टेशन यांना खात्रीलायक बातमी मिळाली की सदरचा गुन्हा हा अजय संतोष भोसले (रा . कोळगाव ता . श्रीगोंदा आकाश तानाजी कोळे रा . कोळगाव ता . श्रीगोंदा) यांनी केला आहे . त्यावरुन गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व कर्मचारी यांनी तांत्रिक तपासाचे आधारे गुप्त बातमीदारामार्फत माहीती काढुन दि .09मे रोजी कोळगाव शिवारात कॉबिंग ऑपरेशन करुन अजय संतोष भोसले यांना कोळगाव येथुन ताब्यात घेवून त्यांना सदर गुन्ह्याबाबत विचारपुस केली असता त्यांनी सुरवातीस उडवाउडवीची उत्तरे दिली नंतर त्यांना विश्वासात घेवुन विचारपुस केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली देवुन सदर गुन्ह्यात चोरलेले सोन्याचे दागिने हस्तगत केले आहे .

 

 तसेच त्यांचेकडे कसुन चौकशी केली असता त्यांनी बेलवंडी कोठार व शिक्षक कॉलनी , श्रीगोंदा येथे चोरी केल्याचे कबुल केले आहेत . त्याबाबत श्रीगोंदा पोलीस स्टेशन गु.रजि . नं . 214/2022 भा.द.वि.क .457,380 व श्रीगोंदा पोलीस स्टेशन गु.रजि . नं . 315/2022 भा.द.वि.क .380 असे गुन्हे दाखल आहेत . सदर आरोपींकडुन एकुण 03 गुन्ह्यातील चोरीस गेलेले 27 ग्रॅम सोन्याचे दागिने व चांदीचे पैंजण हस्तगत करुन आरोपीकडुन घरफोडीचा 01 गुन्हा व चोरीचे 02 गुन्हे उघडकीस आणुन 1,25,000 / – रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे .
आरोपीकडुन उघडकीस आलेले गुन्हे खालीलप्रमाणे श्रीगोंदा पोलीस स्टेशन गु.रजि . नं . 214/2022 भा.द.वि.क .457,380 श्रीगोंदा पोलीस स्टेशन गु.रजि.नं. 314/2022 भा.द.वि.क .380 श्रीगोंदा पोलीस स्टेशन गु.रजि . नं .315 / 2022 भा.द.वि.क .380 आरोपी नामे अजय संतोष भोसले यावर यापूर्वी दाखल असलेले गुन्हे  बेलवंडी पोलीस स्टेशन गु.रजि . नं . 139/2020 भा.द.वि.क .399,402 ● आरोपी पोलीस कस्टडी मध्ये असुन त्यांचेकडुन आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे .

 

सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोसई समीर अभंग व पोकॉ गणेश गाडे हे करीत आहेत . सदरची कारवाई पोलीस अधिक्षक मनोज पाटील साहेब , अप्पर पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल साहेब , उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव साहेब यांचे मार्गदर्शनाखाली श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले , पोसई समीर अभंग , सफी अंकुश ढवळे , पोना गोकुळ इंगवले , पोकाँ प्रकाश मांडगे , पोकॉ किरण बोराडे , पोकाँ दादासाहेब टाके , पोकॉ अमोल कोतकर यांनी केली आहे .
Related Posts
1 of 2,420
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: