“निर्लज्ज लोकांचा देश म्हणजे हिंदुस्थान आहे” – संभाजी भिडे

0 252

सांगली –  नेहमी आपल्या वादग्रस्त विधानाने सोशल मीडिया (Social media) आणि प्रसारमाध्यमात चर्चचा विषय बनू राहत असलेले शिवप्रतिष्ठान (Shiv Pratishthan)  संघटनेचे अध्यक्ष संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी परत एकदा वादग्रस्त विधान केला आहे. सांगली येथे एका कार्यक्रमात बोलताना संभाजी भिडे यांनी पारतंत्र्य, गुलामी, दास्याच्या नरकात राहणाऱ्या बेशरम लोकांचा, एक अब्ज 23 कोटी लोकांचा हा देश आहे. दीर्घ काळ परक्यांचा मार खात, दास्यत्व स्वीकारत, खरकटं उष्टं खात, निर्लज्ज लोकांचा देश म्हणजे हिंदुस्थान आहे. असा वादग्रस्त विधान केला आहे . त्याच्या या विधानाने परत एकदा वाद होण्याची शक्यता आहे.(“Hindustan is the land of shameless people” – Sambhaji Bhide)

नेमका काय म्हणाले संभाजी भिडे

“जगात क्रमांक दोनची लोकसंख्या असलेला आपला देश, मग आपला, देशाचा क्रमांक एक नंबर कधी येणार. तो क्रमांक एक आपण मिळवला आहे. कुठल्या गोष्टीत? लोकसंख्येमध्ये आपल्याला जमलं नाही, चीन पुढे आहे. जो आपला कट्टर दुश्मन, वैरी, मारेकरी, गनीम, शत्रू आहे, पण हिंदूना मेंदू असतो. यात आपला क्रमांक एक आहे. तो म्हणजे निर्लज्जपणात. जगाच्या पाठीवरती 187 राष्ट्र आहेत. त्या राष्ट्रात पारतंत्र्य, परदास्य, परवशता, गुलामी, दास्याच्या नरकात राहण्याचा बेशरमपणा, लाज वाटत नाही, अशा बेशरम लोकांचा, एक अब्ज 23 कोटी लोकांचा देश जगात आहे. दीर्घ काळ परक्यांचा मार खात, दास्यत्व स्वीकारत, खरकटं उष्टं खात, निर्लज्ज लोकांचा देश म्हणजे हिंदुस्थान आहे” असं संभाजी भिडे सांगलीमध्ये दुर्गामाता दौडच्या समारोप प्रसंगी म्हणाले.

डेटिंग अ‍ॅपवर लग्नाच्या आमिष दाखवून महिलेची 73 लाखांना फसवणूक

Related Posts
1 of 1,494

ते पुढे म्हणाले “या देशात देशभक्तीचा, स्वतंत्रचा, भक्तीचा आपण कोण आहोत, या जाणिवेचा प्राण नाही. कशासाठी पोटासाठी खंडाळासाठी इतकीच त्याची लायकी आहे. आपला-परका कोण मित्र कोण हे कळत नाही. या देशात कसली सरकार आहे. हा देश जगाचा बाप बनवा, यासाठी मोठी मोहीम छत्रपती शिवाजी महाराज यांनी हाती घेतली होती. ती मोहीम पार पाडण्यासाठी आपण मोहीम करतो.

मागच्या वर्षी आपल्या या कर्तृत्वसंपन्न शासनाने महाराष्ट्रात कोरोना वाढतो. कोरोना येतो, हा थोतांड आहे. कोरोना हा काल्पनिक आहे. कोरोना हा ना स्त्री ना पुरुष यांना न होणारा कोरोना आहे. कोरोना हा थोतांड आहे. चीनने तुम्हाला आणि आम्हाला पालथं पाडण्यासाठी केलेली बदमाशी आहे. दुर्दैवाने आपल्या महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांच्या अंतःकरणात शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांची वस्ती असती. तर सबंध देशाचं नेतृत्व करणारे ठरले असते.(“Hindustan is the land of shameless people” – Sambhaji Bhide)

हे पण पहा – बॅलन्स सीट जुळल्यानंतर पालकमंत्री जिल्ह्यात येतील | खासदार विखेंचा घणाघात

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: