DNA मराठी

हिजाब प्रकरण पुन्हा चर्चेत; हिजाब घालून परिक्षेला गेल्या विद्यार्थीनींना प्रवेश नाकारले

0 298

दिल्ली – संपूर्ण देशात चर्चेचा विषय बनलेल्या कर्नाटक(Karnataka) मधील हिजाब प्रकरण (Hijab Row) पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. कर्नाटक राज्यात आतापर्यंत या प्रकरणावरून वाद सुरूच आहे.

आज हिजाब घालून परिक्षेला बसण्यासाठी परवानगी न मिळाल्याने कर्नाटकमधील उडुपी येथील पीयू सरकारी कॉलेजमधील दोन विद्यार्थीनींना परिक्षा न देताच परतावे लागले आहे. या प्रकरणानंतर आता त्यांनी हिजाब घालून वर्गात बसता यावे यासाठी याचिका दाखल केली आहे.

आलीया असादी आणि रेशम असं या विद्यार्थीनींचं नाव असून पीयू कॉलेजमध्ये त्या आपल्या बारावीच्या परिक्षेसाठी हिजाब घालून आल्या होत्या. कॉलेजमध्ये हिजाब घालून आल्यावर त्यांना पर्यवेक्षक आणि प्राध्यापकांनी वर्गात जाण्यापासून रोखले. जवळपास 45 मिनिटांपर्यंत त्या बाहेर थांबल्या होत्या पण राज्या सरकारच्या आदेशाला कायम करत न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे त्यांना परवानगी देण्यात आली नाही. त्यानंतर त्या दोघी परिक्षा न देताच चुपचाप निघून गेल्या.

Related Posts
1 of 2,448

याचिका दाखल करणाऱ्या विद्यार्थीनींपैकी आलिया असादी ही राज्यस्तरीय कराटे चॅम्पियन असून तीने या बंदीविरोधात न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. त्यानंतर कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निर्णयावर त्या नाराज झाल्या असून आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या प्रतिक्षेत त्या आहेत.

कर्नाटकमधील हिजाब प्रकरणात सगळ्यांत पुढे असणाऱ्या १७ वर्षीय मुलीने मुख्यमंत्री बस्वराज बोम्मई यांना पत्र लिहीत म्हटलंय की, “आमचं भविष्य उध्वस्त होण्यापासून रोखण्यासाठी अजूनही तुमच्याकडे संधी आहे. हिजाबबंदीच्या प्रकरणामुळे या महिन्याच्या शेवटी होणाऱ्या विद्यापीठ परिक्षेमध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थीनींवर परिणाम होणार आहे.” असंही या याचिकेत म्हटलं आहे.

 

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: