देशात मागच्या २४ तासात आढळले पाच  महिन्यातील सर्वाधिक रुग्ण

0
 नवी दिल्ली –  मागच्या काही महिन्यापासून देशात कोरोना संपण्याच्या मार्गावर होता मात्र आता हळूहळू  देशात परत एखदा कोरोनाची लाट येण्यास सुरुवात झाली आहे . मागच्या काही दिवसांपासून देशभरातून समोर येणारी कोरोनाबांधीत रुग्णांची संख्याने  चिंतेत भर घातली आहे . दररोज नवीन रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ पाहायला मिळत आहे. देशात अक्टिव्ह रुग्णांची संख्या ४ लाखापेक्षा अधिक झाली आहे.  मागच्या चोवीस तासांत कोरोनाचे ५९ हजाराहून अधिक नवे रुग्ण समोर आले आहेत.

देशात याआधी अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत सर्वाधिक वाढ मागील वर्षी सप्टेंबरमध्ये झाली होती. अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या केवळ ६ दिवसात ९ ते १० लाख झाली होती. आता पुन्हा मागील १५ दिवसांपासून रुग्णसंख्येत मोठी वाढ पाहायला मिळत आहे. मागील सात दिवसांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत २.६ टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे.

महाराष्ट्राची जनता भाजपनं चालवलेला हा खेळ कधीच विसरणार नाही – नाना पटोले 

Related Posts
1 of 1,170

कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण यावेळीही महाराष्ट्रातच आढळत आहेत. राज्यात मागच्या चोवीस तासात ३५ हजार पेक्षा जास्त नवीन कोरोनाबंधित रुग्ण आढळून आले आहे . तर मुंबईतच दिवसाला पाच हजारपेक्षा अधिक रुग्ण समोर येत आहेत. राज्यातील ठाणे जिल्ह्यात २,८६९ नवीन रुग्ण समोर आल्यानंतर एकूण रुग्णांची संख्या २ लाख ९६हजार २३ एवढी झाली आहे . राज्यात मागच्या चोवीस तासात  कोरोनाची सर्वाधिक ३५,९५२ नवे रुग्ण समोर आले आहेत. तर मागच्या चोवीस तासात १११ जणांचा कोरोनामुळे राज्यात मुत्यू झाला आहे .

कोरोना तपासणीचा सावळागोंधळ , एकच व्यक्ती जिल्हा रुग्णालयात निगेटिव्ह, तर खाजगी लॅबमध्ये ठरला पॉझिटिव्ह

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: