आहो सरपंच दारूबंदी नावाला …, दारू तर मिळतेय गावाला ..

0 376
 श्रीगोंदा :-  मागील दोन दिवसापूर्वी झालेल्या ग्रामसभेत काही सदस्यांच्या अर्जावरून गावामध्ये दारूबंदी (Alcohol ban) करण्याचा निर्णय झाला असला तरीही आजही सर्व मद्यपींना अगदी जागच्याजागी दारू मिळत असल्याचे चित्र दिसत आहे त्यामुळे आहो सरपंच दारूबंदी नावाला दारू तर मिळते साऱ्या गावाला असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी कडेवळीत याठिकाणी मागील दोन दिवसांपूर्वी शासनाच्या निर्देशानुसार ग्रामसभा घेण्यात आलेल्या ग्रामसभेमध्ये अनेक मान्यवरांकडून दारूबंदी विषयी प्रस्ताव मांडण्यात आले या प्रस्तावाला सर्व गावकऱ्यांनी एकमुखाने मंजुरी देत दारूबंदीचा ठराव संमत केला असला तरीही आजही श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी कडेवळीत या ठिकाणी सर्व ठिकाणी मद्यपींना दारू उपलब्ध होत असल्याने दारूबंदी फक्त नावालाच की काय असा प्रश्न पडतो आहे.
Related Posts
1 of 1,487
 या दारूमुळे गावातील अनेक संसार उद्ध्वस्त झाले असून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्‍ ऐरणीवर येत असूनही ही कारवाई पोलिस प्रशासन आणि उत्पादन शुल्क यांनी करावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांतून होताना दिसत आहे मात्र आजही गावात आणि ठिकाणी खुलेआम दारू विक्री होताना दिसत आहे याबाबत पोलीस प्रशासन नेमके कोणते पाऊल उचललं याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहेत तरीही गावात दारू तस्करांचा हैदोस खुलेआम सुरू आहे याबाबत मात्र कोणीही बोलण्यास तयार नाही मात्र गेलेल्या ग्रामसभेत ठराव नुसतं नावाला संमत केला की काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांतून तसेच महिला वर्गातून उलट सुलट प्रतिक्रिया ऐकण्यास मिळत आहेत मात्र दारूबंदी फक्त नावाला दारू मिळते सार्या गावाला असे म्हणणे काही वावगे ठरणार नाही.
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: