अहमदनगर : जिल्हा परिषदेतील इतिहासात प्रथमच रात्री बारापर्यंत बदल्यांची प्रक्रिया सुरु होती. प्रशासनाच्या चुकीच्या निर्णयामुळे कर्मचार्यांसह त्यांच्या कुटुंबियांना मनस्ताप सहन करण्याची वेळ आली. अहो जाऊ द्या की घरी वाजले की बारा..असेच काही कर्मचारी म्हणत होते.
जिल्हा परिषदेत गुरुवारी रात्री शिक्षण विभागातील विस्तार अधिकारी व केंद्र प्रमुख यांची बदली प्रक्रिया पार पडली. त्यानंतर ग्रामपंचायत संवर्गातील कर्मचार्यांची बदल्यांची प्रक्रिया सुरु करण्यात आली. दोन्ही प्रक्रिया दुपारी चारनंतर करण्यात आली. त्यामुळे या बदल्यांची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरु राहणार असल्याची चर्चा कर्मचार्यांमध्ये होती. रात्री दहापर्यंत बदल्यांची प्रक्रिया सुरु राहिल, अशी अपेक्षा अनेकांनी व्यक्त केली होती.
मात्र सर्वांचेच अंदाज चुकीचे ठरले. ही प्रक्रिया रात्री बारापर्यंत सुरु होती. या मध्ये महिला कर्मचार्यांचे प्रचंड हाल झाले. महिलांना घरी यायला उशीर होणार असल्यामुळे कुटुंबातील इतर मंडळीही मुख्यालयात दाखल झाले होते. मात्र प्रमाणापेक्षा जास्त उशीर झाल्याने सर्वांमधूनच नाराजी व्यक्त करण्यात आली. प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे बदली पात्र कर्मचारी त्यांचे कुटुंबिय व मुख्यालयातील बदली प्रक्रिया राबविणाऱ्या कर्मचार्यांना मनस्ताप सहन करण्याची वेळ आली.
उशिराने बदल्यांची प्रक्रिया उशिराने सुरु केली. त्यानंतर पावसामुळे या प्रक्रीयेत व्यक्त आला. पाऊस सुरु झाल्याने वीज पुरवठाही खंडीत झाला होता. काही वेळात सुरु झाला. मात्र त्यामुळे प्रक्रियेला वेळ लागला. या प्रक्रियेवर आता नाराजी व्यक्त होत आहे. झेडपीच्या इतिहासात प्रथमच अशी वेळ आलेली आहे.