शहरात मोकाट जनावरांचे कळप, अपघाताची भीती वाढतेय, प्रशासन मात्र सुस्त

0 245

श्रीगोंदा ;- शहरात अनेक ठिकाणी मोकाट जनावरांचे कळप दिसत आहेत त्यामुळे श्रीगोंदा (Shrigonda) शहरातील नागरिक भयभीत होऊन जगताना दिसत आहेत . श्रीगोंदा शहरातील रस्त्यावर फिरणाऱ्या मोकाट जनावरांच्या कळपांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. यामुळे अपघाताची (accidents) शक्यताही वाढली असून वाहचालकांचे जीव धोक्यात आले आहेत. मोकाट जनावरे पकडण्याची मोहीम महापालिकेकडून राबवली जात नसल्याने या जनावरांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. रस्त्यांवरील या जनावरांमुळे सामान्य माणूस मात्र त्रस्त झाला आहे.

मागील अनेक दिवसांपासून पाळीव मोकाट जनावरांचा शहरात त्रास वाढत असताना त्यांच्या बंदोबस्त करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येत नाहीत. शहरातील बगाडे कॉर्नर,बस स्थानक, खंडोबा चौक, शेख महंमद महाराज पटांगण,बाजारतळ अशा वेगवेगळ्या भागांमधील रस्त्यांवर तर जणू काही ठिकाणी जनावरांचे साम्राज्य असल्यामुळे वाहनचालकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्यावर तर कायम मोकाट जनावरे दिसतात. श्रीगोंदा काष्ठी या रस्त्यावर  रुग्णालयासह दोन महाविद्यालय आहे. तसेच शनी चौक ते वडाळी रोड परिसरात जाण्यासाठी हा महत्त्वाचा रस्ता आहे. त्यामुळे या रस्त्यावर सातत्याने वर्दळ असते; मात्र, या रस्त्यावर मोकाट जनावरे फिरत असल्यामुळे येथे अनेकदा वाहनचालकांना अचानक ब्रेक मारावा लागतो.

त्यामधून अपघात होण्याचा धोकाही वाढला आहे. या भागात जनावरे रस्त्याच्या मधोमध बसलेली असल्यामुळे अनेकदा वाहतूक खोळंबते.होनराव चौक ते नगरपरिषद याभागातही मोकाट जनावरांचे कळप मोठ्या प्रमाणात दिसतात. या रस्त्यावर असणाऱ्या  पटांगण येथे भाजीबाजार भरतो. त्यामुळे भाजी विक्रेत्यांनी खराब झालेली भाजी फेकून दिल्यानंतर ती खाण्यासाठी येथे जनावरांचा कळपच उभा असतो. याचाही वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून त्याचा नागरिकांना ही त्रास होत आहे.

पोलिसांच्या वर्दीला दाग, पोलीस ठाण्यात महिलेला पगार देण्याच्या बहाण्यानं बोलवलं अन्..

कचऱ्यामुळेही समस्या वाढली

शहरामध्ये कचरा टाकण्यासाठी परिषदेने ठिकठिकाणी कचराकुंडी ठेवल्या आहेत. मात्र, त्यानंतरही रस्त्यावर किंवा मोकळ्या भूखंडांवर कचरा टाकण्याचे प्रकार अद्याप सुरू आहेत. रस्त्यावर टाकलेल्या या कचऱ्यामध्ये अन्नाच्या शोधासाठी मोकाट जनावरे येत आहेत. त्यामुळे त्या परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

हे पण पहा – दिल्लीच्या तख़्तासमोर महाराष्ट्र कधीही झुकलेला नाही आणि झुकणार नाही

Related Posts
1 of 1,608
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: