पुढचे तीन दिवस राज्यात मुसळधार पाऊस, ‘या’ जिल्ह्यांना yellow alert

0 78

नवी मुंबई –  राज्यात पुढील तीन दिवस पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. अरबी समुद्रात कर्नाटकाच्या किनाऱ्यालगत कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यानं पावसाचा अंदाज आहे.( Heavy rains in the state for next three days, yellow alert to ‘these’ districts)

ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर या भागात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मेघगर्जना होऊन पाऊस होण्याची शक्यता आहे. तर विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

पुढच्या चार दिवसात मुसळधार पाऊस

पुढील चार दिवस राज्यात विविध ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची (Heavy rainfall) शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याने दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट (yellow alert) जारी केला आहे.

Related Posts
1 of 1,487

समीर वानखडे यांनी घेतली मुंबई पोलीस आयुक्तांची भेट, कारण गुलदस्त्यात

सध्या शेतीतील कापणीची कामं संपली आहेत. तर अनेक जिल्ह्यांमध्ये रब्बी हंगामातील पिकांची लागवड करण्यास सुरुवात झाली आहे.(Heavy rains in the state for next three days, yellow alert to ‘these’ districts)

हे पण पहा- दंगल भडकवण्यामागे अनिल बोंडेचा हात – नवाब मलिक

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: