Heavy Rain: तीन दिवसापासून बरसणाऱ्या तुफान पावसामुळे श्रीगोंद्यात बळीराजा सुखावला

0 11

Heavy Rain: श्रीगोंदा तालुक्यांत दोन- तीन दिवसांपासून जाणवणाऱ्या ढगाळ वातावरणाने उकाडा वाढला होता. अखेर पर्वा रात्रीपासून तालुक्यांत पावसाचे आगमन झाल्याची नोंद घेण्यात आली. तालुक्यांत दिवसभर पावसाची संततधार कायम होती पावसाची रिपरिप सुरू असली, तरी अद्यापही काही ठिकाणी पावसाची प्रतीक्षाच आहे.

 

श्रीगोंदा तालुक्यात मागील तीन दिवसापासून शहरासह तालुक्यात पावसाची रिपरिप सुरू होती. त्यामुळे हवेत गारठा होता. पावसाची प्रतीक्षा संपल्याने तालुक्यातील बळीराजाही आनंदात होता.तीन दिवसापासून पावसाला सुरुवात झाली. शहर व परिसारत तीन दिवसापासून सकाळी आठ वाजेपर्यंत अनेक मिलिमीटरच्या पावसाची नोंद शासनाच्या पर्जनमापकाकडे झाली आहे.

 

त्यानंतर सकाळपासून काल दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती.अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पावसाचे आगमन झाले. दिवसभर रिमझिम पावसाच्या सरी पडत होत्या. पावसाच्या आगमनाने रखडलेल्या पेरण्या पूर्णत्वास तर पेरणी झालेल्या पिकांना जीवदान मिळाले आहे. त्यामुळे चिंतेत असलेला बळीराजाच्या खरिपाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

 

Related Posts
1 of 2,177

पावसाने मारलेली दडी व लांबणीवर पडलेल्या पावसामुळे खरिपाच्या पेरण्या रखडल्या असल्याने कधी नव्हे ती परिस्थिती निर्माण झाली आहे.तालुक्याच्या काही ठिकाणी तुरळक प्रमाणात पाऊस पडला तो अपवाद सोडला तर संपूर्ण तालुका सप्टेंबर महिना आला तरी कोरडाच पाहावयास मिळत होता. अनेक दिवस चातकाप्रमाणे बळीराजा पावसाची वाट पाहात आहे. ज्या परिसरात पाऊस पडला, तर परिसरात पेरण्या झाल्या असल्या, तरी काही पिकाचा अपवाद वगळता दुबार पेरणीचे संकट बळीराजा समोर निर्माण झाले आहे. सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास रिमझिम पावसाचे आगमन झाले. दिवसभर कधी रिमझिम तर कधी दमदार पावसाच्या सरी पडत होत्या. दिवसभर पावसात सातत्य होते व हवेत गारवा निर्माण झाला होता. पडलेल्या पावसामुळे रखडलेल्या पेरण्या पूर्णत्वास काही दिवसांत जातील व पेरणी झालेल्या पिकांना जीवदान मिळणार आहे. पावसाचे आगमनामुळे चिंतेत असणाऱ्या खरिपाच्या आशा पल्लवित झाल्या असल्याने बळीराजा सुखावला आहे.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: