पुढील चोवीस तासांत या जिल्ह्यात मुसळधार पाऊस , हाय अलर्ट जारी

0 481

नवी मुंबई –  मागच्या आठवड्यापासून राज्यात परत एकदा बहुतेक ठिकाणी मुसळधार पाऊसाची(Heavy rain)  सुरुवात झाली असून येणाऱ्या आणखी काही दिवस राज्यात मुसळधार पाऊस असणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. (Heavy rain, high alert issued in the district in next 24 hours)

तसेच येत्या चोवीस तासात राज्यातील जवळपास १४ जिल्ह्यात मुसळधार पाऊसाची शक्यता कुलाबा वेधशाळेकडून वर्तवण्यात आली आहे.आज उत्तर कोकण म्हणजे मुंबई, ठाणे, पालघरमध्ये एक दोन ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता असून कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातल्या काही भागांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे तर यवतमाळ जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे.

कुलबा शाळेने हवामान खात्याने आज नंदुरबार, जळगाव, धुळे, नाशिक, पालघर, मुंबई, ठाणे, रायगड, औरंगाबाद, जालना, बुलडाणा, वाशीम, चंद्रपूर, आणि वर्धा अशा चौदा जिल्ह्यांना अलर्ट ( Alert) दिला आहे. याठिकाणी पुढील चोवीस तासात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे.

पंतप्रधान कार्यालयाकडून एक फोन अन्… मोदी मंदिरातून मूर्ती हटवली

Related Posts
1 of 1,481

राज्यातील काही जिल्ह्यांत अतिमुसळधार पावसामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. दरम्यान, दोन दिवसानंतर पुन्हा जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. आजही राज्यातील अनेक ठिकाणी पावसाची स्थिती निर्माण झाली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांना आजही हवामान खात्याकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे.  ( Heavy rain, high alert issued in the district in next 24 hours)

हे पण पहा –  मी नव्हे  तो पुन्हा येईल… ‘या’ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता. 

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: