DNA मराठी

धनंजय मुंडे यांना हृदयविकाराचा झटका: जाणुन घ्या संपूर्ण माहिती

0 367
Woman arrested for blackmailing Dhananjay Munde; Learn the whole case

 प्रतिनिधी DNA मराठी टीम 

मुंबई –   राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना मंगळवारी रात्री हृदयविकाराचा झटका (Heart Attack) आल्याने त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात (breach candy hospital) उपचारसाठी दाखल करण्यात आला आहे. राज्याचे  आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh tope) यांनी ब्रीच कँडी रुग्णालयात जाऊन  त्यांची भेट घेतली आहे. (Heart attack to Dhananjay Munde: Find out the full details)

धनंजय मुंडे यांच्यावर मागच्या काही दिवसापूर्वी  महिलेने लग्नाच्या बहाण्याने बलात्कार आणि धमकी दिल्याचा आरोप केला होता. यानंतर धनंजय मुंडे चर्चेत आले होते.  मात्र, वादाच्या संदर्भात मुंडे यांनी आरोपी महिलेच्या बहिणीसोबतचे संबंध असल्याचे मान्य केले होते. त्यांनी सांगितले की, मी त्यांच्या मुलांचे नावही ठेवले आहे.
Related Posts
1 of 2,482
धनंजय मुंडे हे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे आहेत. त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात भाजपची युवा शाखा भारतीय जनता युवा मोर्चापासून केली. 2012 मध्ये त्यांनी भाजप सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला. 2014 मध्ये त्यांना विधान परिषदेचे सदस्य करण्यात आले. त्याच वर्षी त्यांनी विधानसभेची निवडणूकही लढवली पण पंकजा, त्यांची चुलत बहीण आणि गोपीनाथ मुंडे यांच्या मुलीकडून निवडणूक हरली. 2019 मध्ये बीडच्या परळी मतदारसंघातून त्यांचा पुन्हा पंकजा मुंडे यांच्याशी सामना झाला आणि यावेळी त्यांनी निवडणूक जिंकली.(Heart attack to Dhananjay Munde: Find out the full details)
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: