लाच घेतल्या प्रकरणी आरोग्य निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक ACB च्या जाळ्यात

0 347

पुणे –   कचरा उचलून येरवडा कचरा रॅम्प (डेपो) येथे टाकण्यासाठी आणि टेम्पो सुरू ठेवण्या करीता लोकसेवक स्वप्नील भगवान कोठावळे आरोग्य निरीक्षक (Sanitary Inspector)  पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation) (वय- 32) यांनी टेम्पो मालकाकडे दरमहा ५ हजार रुपयांची मागणी केली होती. या मागणीनुसार प्रकाश दौलत वाघचौरे (वय- 56)या खाजगी इसम द्वारे ती लाच स्वीकारले असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) दि. ११ नोव्हेंबर रोजी रंगेहाथ पकडले आहे. (Health inspector police and sub-inspector ACB in bribery case)

ही कारवाई राजेश बनसोडे पोलीस अधीक्षक,लाप्रवि पुणे परिक्षेत्र,सुरज गुरव,अपर पोलीस अधीक्षक,लाप्रवि पुणे,सुहास नाडगौडा,अपर पोलीस अधीक्षक, लाप्रवि पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षकश्रीराम शिंदे,  म पो शि पूजा पागिरे, पो,शि.अंकुश आंबेकर,पो.शि. सौरभ महाशब्दे,चालक पो.ना. दिवेकर सर्व ला.प्र.वि.पुणे युनिट  यांनी केली आहे.

तर दुसरीकडे लोकसेवक मारोती खुशालराव नंदे (वय 35 वर्ष) पोलीस उपनिरीक्षक पो.स्टे. गोरेगाव रा. चोंढी ता मुखेड जि नांदेड यांनी दिवाळी निमित्त एक महिना कल्ब चालू देण्यासाठी आणि त्या क्लबवर कोणतीही कारवाई ना करण्यासाठी  कल्ब मालक (वय 29 वर्ष) यांच्याकडे १० हजार रुपयांची लाचेची मागणी केली. या मागणीनुसार ३ हजार रुपये स्वीकारले आणि उर्वरित ७ हजार रुपये लाचेची रक्कम स्वीकारण्यास संमती दिल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अरबाज खानच्या “या” सवयीला कंटाळली होती मलायका अरोरा

Related Posts
1 of 1,608

वरील कारवाई श्रीमती कल्पना बारवकर, पोलीस अधिक्षक, ला. प्र. वि. नांदेड परिक्षेत्र नांदेड यांच्या  मार्गदर्शनाखाली  निलेश सुरडकर, पोलिस उपअधीक्षक,HC विजय उपरे, NPC रुद्रा कबाडे, ज्ञानेश्वर पंचलिंगे, तान्हाजी मुंढे, अविनाश किर्तनकार आणि हिमतराव सरनाईक यांनी केली आहे. (Health inspector police and sub-inspector ACB in bribery case)

 हे पण पहा – नऊ ते दहा दिवसात चौकशी पूर्ण करून शासनाला अहवाल दिला जाईल – राधाकृष्ण गमे

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: