तो कधी मराठा आंदोलकांना भेटला नाही – निलेश राणे 

0 11
 नवी मुंबई –  मागच्या दोन महिन्या पेक्षा जास्त कालावधीपासून देशाची राजधानी दिल्लीच्या सीमेवर केंद्र सरकारने लागू केलेल्या तीन कृषी कायद्याविरोधात  आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटनेला शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी शिवसेनाच्या इतर ६ नेत्यांबरोबर  आंदोलन करणारे शेतकरी संघटनेला समर्थन देण्यासाठी आणि केंद्राने लागू केलेल्या तिन्ही कृषी कायद्याचा विरोध दर्शवण्यासाठी गाझीपूरच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना संजय राऊत यांनी भेट दिली आणि त्यांच्याशी चर्चा करून त्यांना आपण त्यांच्या बरोबर उभे आहे असे आश्वासन दिले .
                                                                     मुंबईमधील पंचतारांकित हॉटेलमध्ये अभिनेत्रीसोबत छेडछाड

मात्र शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांच्या या भेटीवर आता भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांचे पुत्र नीलेश राणे यांनी ट्विट करत निशाणा साधला आहे.

Related Posts
1 of 1,321

भाजपा नेते निलेश राणे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की संज्या राऊत जितका झटपट दिल्ली येथील आंदोलनाच्या ठिकाणी फोटो काढायला गेला तसाच कधी मराठा आंदोलकांना भेटला नाही. महाराष्ट्रामध्ये कुठल्याही आंदोलनाला संज्या कधी गेला नाही, महाराष्ट्रातले आंदोलनकारी नको फक्त महाराष्ट्र हे नाव पाहिजे राजकारण करायला… एक नंबर ढोंगी . अशा शब्दात भाजपा नेते निलेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे .

                           दलीत तरुणीवर लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार ,बेलवंडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल 

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: